Karnataka Hijab Controversy esakla
देश

Hijab Controversy: हिजाब घातलेल्या विद्यार्थींनींना पाठविले परत

बेळगावात शाळा व महाविद्यालया समोर कडक पोलिस बंदोबस्त

सकाळ डिजिटल टीम

बेळगाव : हिजाबमुळे (Hijab Row) बंद ठेवण्यात आलेली पदवीपूर्व आणि पदवी महाविद्यालये राज्यात आठ दिवसानंतर बुधवारी (ता. १६) सुरु करण्यात आली. बेळगाव (Belguam)शहरात काही महाविद्यालयात तरुणींनी हिजाब घालूनच प्रवेश केला. मात्र, त्यांना महाविद्यालयात प्रवेश देण्यात आला नाही. या वातावरणामुळे बहुतांशी महाविद्यालयांसमोर बुधवारी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ (M.G. Hiremath) यांनी देखील सरदार्स पी. यु. कॉलेजला भेट देऊन पाहणी केली. (Karnataka Hijab Controversy)

हिजाब परीधान करून आलेल्या विद्यार्थींनीना परत पाठविण्यात आले. यानंतर या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली.

राज्यात बुधवारपासून (ता. ९) हिजाबचा वाद निर्माण झाला आहे. तेव्हापासून शाळांबरोबर, पदवीपूर्व व पदवी महाविद्यालये बंदच होती. सोमवारपासून शाळा सुरु झाल्या. शाळांमध्ये देखील मुली हिजाब घालूनच प्रवेश करताना दिसल्या. हिजाबवरून मंगळवारी (ता. १६) सरदार्स कॉलेजमध्ये (Sardars College) सामाजिक कार्यकर्त्या व पोलिसात चकमक उडाली. तसेच बुधवारीही शहरातील लिंगराज कॉलेजमध्ये (Lingaraj College) हिजाब परीधान करून आलेल्या विद्यार्थींनीना परत पाठविण्यात आले. यानंतर या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली.

उच्च न्यायालयाच्या (High Court) अंतिम आदेशाच्या आधारे पदवीपूर्व व पदवी वर्गात हिजाब घालून येणाऱ्यांना रोखले जाईल, असे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश (Minister of Education b. C. Nagesh) यांनी यापूर्वीच सांगितले होते. त्यांनुसार बुधवारी ज्या विद्यार्थींनी हिजाब परीधान करून येत होत्या. त्यांना रोखण्यात आले. शाळा महाविद्यालयात हिजाब घालून आलेल्या विद्यार्थींनींना प्रवेशद्वाराजवळ अडविले जात होते व शाळेचा ड्रेसकोड घालून येण्याच्या सुचना केल्या जात होत्या. काही विद्यार्थ्यांनीही सुचनांचे पालन केले. मात्र, काही विद्यार्थींनी माघारी फिरल्या. कोणत्याही वादावादीच्या घटना होऊ नयेत. यासाठी प्रत्येक शाळा व महाविद्यालया समोर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT