शाळा sakal media
देश

Hijab Controversy : दिल्लीच्या या शाळांमध्ये ड्रेस कोड लागू

सकाळ डिजिटल टीम

देशाच्या विविध भागात हिजाबचा वाद (Hijab Controversy) सुरू आहे. यामुळेच कर्नाटकानंतर आता दिल्लीतील शाळांमध्ये ड्रेस कोड जारी करण्यात आला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी धार्मिक कपडे घालून शाळेत येऊ नये, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. दक्षिण दिल्ली महानगरपालिकेच्या (SDMC) शिक्षण समितीने शाळांमधील ड्रेस कोडबाबत आदेश जारी केला आहे. शिक्षण समितीच्या अध्यक्षांनी दिलेल्या आदेशात विद्यार्थ्यांनी धार्मिक पोशाख घालून शाळांमध्ये येऊ नये, असे म्हटले आहे. शाळांमध्ये ड्रेस कोड पाळला जाईल.

दक्षिण दिल्ली (Delhi) महानगरपालिकेच्या अंतर्गत चालणाऱ्या प्राथमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी शालेय गणवेश निर्धारित करण्यात आला आहे. ज्यामध्ये शाळकरी मुले खूप सुंदर दिसत आहेत. दक्षिण दिल्ली महानगरपालिका वेळोवेळी मुलांच्या गणवेशाचा (School Dress) रंग बदलत असते, असे दिल्ली महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या संचालक नितिका शर्मा यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

शाळेत शिकणाऱ्या मुलांमध्ये श्रीमंत आणि गरिबांच्या संदर्भात एकमेकांबद्दल कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड निर्माण होत नाही. काही पालक आपल्या मुलांना आपापल्या धर्माचे कपडे घालून शाळेत पाठवत असल्याचे गेल्या काही काळापासून दिसून येत आहे. हे कोणत्याही प्रकारे योग्य नाही. यामुळे मुलांमध्ये असमानतेची मानसिकता निर्माण होईल जी त्यांच्या भविष्यासाठी कोणत्याही प्रकारे चांगली नाही, असेही आदेशात म्हटले आहे.

या सर्व बाबी लक्षात घेऊन सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात याव्यात की, शाळेतील मुले त्यांच्या गरजेनुसार ड्रेस कोडमध्येच (Dress code) शालेय स्पर्धा आणि उत्सवांमध्ये येऊ शकतील. सामान्य दिवस फक्त शालेय गणवेशात उपस्थित राहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT