Karnataka Hijab Controversy Karnataka Hijab Controversy
देश

Hijab : सरकारकडून नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू होण्याची शक्यता

सकाळ डिजिटल टीम

बेंगळूरू : कर्नाटकातील हिजाबवरून (Hijab Controversy) सुरू झालेला वाद अद्याप शांत झालेला नाही. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. तरीही शाळेत विद्यार्थिनी शाळेत हिजाब घालून येत आहे. यामुळे वाद वाढत आहे. प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे तोपर्यंत कर्नाटक सरकार शाळा आणि महाविद्यालयांमध्ये धार्मिक पोशाखांवर बंदी घालण्याच्या उच्च न्यायालयाच्या प्रस्तावावर आधारित हिजाबच्या वापरावर मानक कार्यप्रणाली (SOP) लागू करू शकते. (Karnataka Hijab Controversy)

न्यायालयाच्या आदेशानंतरही काही विद्यार्थिनी हिजाब (Hijab Controversy) घालून शाळेत आल्या. यामुळे विद्यार्थिनींना शाळेच्या गेटबाहेर उभ्या असलेल्या अधिकाऱ्यांनी हिजाब काढण्यास सांगितले. यामुळे अधिकारी, विद्यार्थिनी आणि पालकामध्ये चांगलाच वाद झाला. अशा परिस्थिती टाळण्यासाठी सरकार (Karnataka government) नवीन मार्गदर्शक (new guidelines) तत्त्वे आणण्याची शक्यता आहे. सरकार शाळा आणि महाविद्यालयांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करू शकते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उच्च न्यायालयाच्या प्रस्तावावर आधारित अशा मार्गदर्शक तत्त्वांवर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे शिक्षणमंत्री बीसी नागेश, शिक्षण विभागाचे अधिकारी आणि गृह विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणाले की, कर्नाटकातील महाविद्यालये पुन्हा सुरू होऊ शकतात. परंतु, विद्यार्थ्यांना धार्मिक कपडे घालण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT