Hijab karnataka row esakal
देश

बांगड्या, क्रॉसला सूट का? हिजाब वादावर कोर्टात उपस्थित झाला प्रश्न

कर्नाटक उच्च न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे.

सुधीर काकडे

Hijab Row: कर्नाटक उच्च न्यायालयात हिजाब प्रकरणाबाबत सुनावणी सुरू आहे. यावेळी मुस्लिम विद्यार्थिनींच्या वकिलाने पक्षपातीपणाचा आरोप केला. सरकार फक्त हिजाबचाच मुद्दा का काढततंय. ते म्हणाले की, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिंदू मुली बांगड्या घालतात, तर ख्रिश्चन मुली क्रॉस घालतात. तेव्हा शाळा महाविद्यालयांतून त्यांना बाहेर का पाठवलं जात नाही असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. सरकारी आदेशात इतर कोणत्याही धार्मिक प्रतिकांचा उल्लेख केला गेलेला नाही. मग फक्त हिजाबच का? हिजाब घालणाऱ्यांच्या धर्मामुळे तर नाही ना? मुस्लिम मुलींशी होणारा भेदभाव हा पूर्णपणे धर्मावर आधारित आहे असा आरोप त्यांनी युक्तीवादा दरम्यान केला. (Hijab Row Hearing - Karnataka High Court)

हिजाबची मागणी करणार्‍या विद्यार्थिनींच्या वकिल म्हणाले की, जर या बंदीबाबत कोणताही आदेश जारी केला असेल, तर विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना किमान वर्षभरापूर्वी त्याची माहिती द्यावी दिली जावी. अधिवक्ता रविकुमार वर्मा यांनी शिक्षण कायद्याचा हवाला देत हे सांगितलं की, कोणताही नियम एक वर्ष अगोदर सांगण्याची तरतूद आहे. यासोबतच या प्रकरणाच्या सुनावणीसाठी हायकोर्टाने कालमर्यादा निश्चित करून हिजाबच्या वादावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. ते म्हणाले की, कर्नाटक शिक्षण कायद्यात हिजाबवर बंदी घालण्यासारखे काहीही प्रस्तावित नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : राज्यात अवकाळी अन् गारपिटीचे संकट, ७ जिल्ह्यांना अलर्ट जारी; पुढील २ दिवस धोक्याचे

Latest Marathi News Live Update : गुढीपाडव्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

Pune Satara Highway: पुणे-सातारा महामार्गावर हरिश्चंद्री येथे तीन फूट पाणी; गारांसह जोरदार अवकाळी पाऊस, पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा!

Unseasonal Rain: अवकाळी पावसाचा पिकांना दणका! राज्यभरात फळबागांचे मोठे नुकसान; तासभर गारांचा मारा..

Chandrashekhar Bawankule: राज्यातील जमिनींचे ‘मायक्रो झोनिंग’ होणार: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मुद्रांक सुधारणा विधेयक मंजूर!

SCROLL FOR NEXT