Karnataka Hijab controversy 
देश

Hijab Row: कोण आहे ती हिजाबमधील मुलगी? ओवैसींनी केल ट्विट

सकाळ डिजिटल टीम

: कर्नाटकच्या एका कॉलेजमधील एक व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगी हिजाब परिधान करून कॉलेजमध्ये प्रवेश करते. त्याचवेळी गर्दीतील काही मुल तिच्यासमोर 'जय श्री राम' , 'जय श्री राम' म्हणत घोषणाबाजी सुरू करतात, त्यावर ती मुलगी देखील 'अल्‍लाहू अकबर' अशी घोषणाबाजी करते. ही संपूर्ण घटना कर्नाटकमधील मांडाया येथे घडली आहे. (Asaduddin Owaisi Tweet)

हा व्हायरल व्हिडीओवर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे. त्यांनी या मुलीच्या समर्थानामध्ये ट्वीट (Tweet) केले आहे. ; ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करुन त्याने तिला सलाम केला आहे. ''त्या मुलीच्या आई-वडीलांना माझा सलाम आहे. या मुलींना एक आदर्श घालून दिला आहे.'' असे ते म्हणाले.

''भीक मागून आणि अडवून काही मिळणार नाही. असा संदेश या मुलीने कित्येक दुर्बलांना दिला आहे. असे ओवैसी या व्हिडिओमध्ये म्हणाले आहे. ''जे काम त्या मुलीनी केले आहे ते मोठ्या हिमंतीचे आहे. या मुलीने एक आदर्श ठेवला आहे.'' असेही ते म्हणाले. (Karnataka Hijab controversy)

ओवैसीने आपल्या कित्येक ट्विटमध्ये मुस्लिम मुलींचे कौतुक केले आहे. त्यांनी एका ट्विटमध्ये लिहले आहे की, ''हिंदुत्ववादी जमावाविरुद्ध मुस्लिम मुलींनी धैर्य दाखवले आहे. आपल्या संविधानिक आधिकांराना योग्य पध्दतीने मांडले आहे. जे घडले ते राज्याच्या संगनमताने घडले आहे.''

तसेच आपल्या ट्विटमधून प्रधानमंत्रीवरही निशाना साधला. ते म्हणाले की, ''प्रधानमंत्री दोन वेळा संसदेत बोलले पण एकदाही त्यांनी कर्नाटकच्या स्थितीवर भाष्य केले नाही. त्यांच्या मौन राहण्याचा काय अर्थ होतो? हेच त्यांचे 'बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ'' आहे का?'' असा प्रश्नही त्यांनी उपस्थितीत केला.

त्या मुलीने काय सांगितले?

व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या हिजाबमधील मुलीचे नाव मुस्कान आहे. 'इंडिया टुडे / आज तक'सोबत साधलेल्या संवादात तिने सांगितले की,'' मी कॉलेजमध्ये असाईनमेंटसाठी आले होते पण, ते लोक मला जाऊच देत नव्हते कारण मी हिजाब परिधान केला होता. ते मला सांगत होते की, ''बुर्खा काढून आतमध्ये जा. जेव्हा मी आत गेले तर त्यांनी पुन्हा जय श्री राम, जय श्री रामची घोषणाबाजी सुरू केली. जे लोक घोषणाबाजी करत होते त्यापैकी काही लोक कॉलेजचे होते तर काही बाहेरचे होते. ''

तिने सांगितले की, त्यांच्या घोषणाबाजी विरुद्ध मी देखील 'अल्‍लाहू अकबर'ची घोषणाबाजी केली. मुस्काने सांगितले की, ते मुलं सारखे मला घेरत होते. माझे शिक्षक, प्रिंसिपल यांनी मला मदत केले. त्यांनीच सर्वांपासून वाचवून मला आत घेऊन गेले.

मुस्काने सांगितले की,''जोपर्यंत मी हिजाब काढणार नाही तोपर्यंत तेही भगवा कपडा काढणार नाही'' असे तिला घेरणारे लोक म्हणत होते.

याबाबत कर्नाटकचे शिक्षणमंत्री बीसी नागेशने सांगितले की, ''काही लोकांनी वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला. त्यांनीच सांगितले की, विद्यार्थी-विद्यार्थिंनी शाळेच्या युनिफॉर्ममध्येच यावे. ते म्हणाले की, ''या प्रकरणामध्ये काही राजकीय पक्षाचे लोक सहभागी आहेत.

नक्की वाद काय झाला?

कर्नाटकमध्ये कित्येक शाळा कॉलेजमध्ये हिजाब/ बुर्का घालण्यावरून वाद पेटला आहे. एकीकडे मुस्लिम विद्यार्थींनी शाळ-कॉलेजमध्ये हिजाब परिधान करुन येण्यास विरोध दर्शविला जात आहे तर दुसरीकडे काही छात्र भगवा स्कार्फ वापरून आपला विरोध दर्शवित आहे. हे प्रकरण कोर्टात पोहचले आहे. नुकतेच कर्नाटक सराकारने राज्यामध्ये Karnataka Education Act-1983 कलम १३३ लागू केला आहे. त्यामुळे आता स्कूल-कॉलेमध्ये यूनिफॉर्म वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे.

त्यामुळे आता सरकारी शाळा आणि कॉलेजमध्ये जो युनिफॉर्म वापरला पाहिजे. खासगी शाळा स्वत:चा एक युनिफॉर्न निवडू शकतात हा वाद मागच्या महिन्यापासून म्हणजेच जानेवारीपासून सुरू झाला आहे. जेव्हा उड्डपी सरकारने कॉलेजमध्ये ६ विद्यार्थींनी हिजाब घालून शाळेमध्ये प्रवेश केला होता. वाद या मुद्द्यावरून सुरु झाला की, कॉलेज प्रशासनाने विद्यार्थिंनींना हिजाब वापरण्यासाठी मनाई केली तरीही त्या हिजाब परिधान करून आल्या.''

कित्येक कॉलेजमध्ये वाद सुरू

या घटनेनंतर, दुसऱ्या कॉलेजमध्येही हिजाब परिधान करण्यावरुन वाद पेटला आहे. पण आता सर्वांचे लक्ष हाय कोर्टच्या निर्णयाकडे आहे. या मुद्द्यावर मुस्लिम विद्यार्थींनींचे म्हणणे आहे की, आजपर्यंत त्या हिजाब वापरून शिक्षण घेत आहोत आणि याबाबत कधीचा कोणता वाद झाला नाही. तेच दुसऱ्या पक्षाचे म्हणणे आहे की, शिक्षणाचा युनिफॉर्मसोबत काही देणे घेणे नाही आणि सर्वांनी शाळेमध्ये एक समान वागणूनक मिळाली पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

SCROLL FOR NEXT