देश

Hijab: हिजाब प्रकरण म्हणजे जाणीवपूर्वक केलेला कट; राज्यपाल आरिफ खान

मुस्लिम तरुणींना चार भिंतीच्या आत ठेवण्याचा जाणीवपूर्वक केलेला कट आहे

सकाळ डिजिटल टीम

केरळ : हिजाब प्रकरणावरुन रोज नविन मुद्दे समोर येत आहेत. कर्नाटकच्या मांड्या जिल्ह्यातील व्हिडिओवरून एमआयएमचे (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी हिजाबचं समर्थन करताना मोठी वक्तव्य केले आहे. दरम्यान, केरळचे (Kerala) राज्यपाल आरिफ मोहम्मद खान (Arif Khan)यांनी ट्विट करत टीका केली आहे. मुस्लिम तरुणींना घरातच ठेवण्याचा कट रचला जात आहे असा आरोप त्यांनी केला आहे.

राज्यपाल आरिफ खान म्हणतात, हिजाब हा वाद नसून मुस्लिम तरुणींना घरात चार भिंतीच्या आत ठेवण्याचा जाणीवपूर्वक केलेला कट आहे. कारण मुली ह्या नेहमीच मुलांनपेक्षा चांगले काम करण्याचा प्रयत्न करतात. त्या मुलांनपेक्षा सर्वच क्षेत्रात पुढे आहेत. त्यांना परीवृत्त करण्यासाठी रजलेला हा डाव आहे. असे मत आरिफ खान यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान हा वाद प्राथमिक शाळेपर्यंत पोहोचला असून, बंगळूर (Bengalur) शहरातील एका शाळेत मुलींनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून हिजाब घातल्याने मोठा गोंधळ झाला.काल चंद्रा ले आऊटमधील एका शाळेतील काही मुलींना हिजाब काढण्यास सांगण्यात आले. एका शिक्षिकीने वर्गातील बोर्डवर हिजाब आणि मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह लिहिल्याचा आरोप करून विद्यार्थी आणि पालकांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, या आरोपावरून शाळेतील त्या शिक्षिकेला संचालक मंडळाने निलंबित केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT