Agitation Sakal
देश

Hijab Row: कर्नाटकात शैक्षणिक संस्थांभोवती दोन आठवडे 144 कलम लागू

जारी केलेले आदेश आजपासून लागू करण्यात आले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

बंगळुरू : कर्नाटकात सुरु असलेल्या हिजाब (Hijab Issue In Karnataka) प्रकणानंतर बेंगळुरूमधील शैक्षणिक संस्थांभोवती कलम 144 लागू करण्यात आले असून, पुढील दोन आठवडे शैक्षणिक संस्थांच्या 200 मीटर परिसरात आंदोलन करता येणार नाही, असे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत. नव्याने जारी करण्यात आलेले आदेश आजपासून लागू करण्यात आल्याचेही पोलिसांना स्पष्ट केले आहे. (Section 144 Imposed For Educational Institution )

धार्मिक पेहराव हिजाबवर बंदी घालण्याच्या आदेशानंतर कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये खळबळ उडाली आहे. कर्नाटक आणि तेथील शाळा-महाविद्यालयांमधून हा वाद देशभरात पोहोचला आहे. (Hijab Protest In Karnataka) आता विविध पक्षांचे राजकारणीही यावरून आमने-सामने आले आहेत. दरम्यान, या प्रकरणानंतर प्रियंका गांधी, असदुद्दीन ओवैसी, केशव मौर्य, व्हीके सिंग आदी नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून, प्रियंका गांधी हिजाबबाबत मुस्लिम मुलींच्या समर्थनार्थ पुढे आल्या आहेत. तर, या मुद्द्यावरून द्वेष पसरवला जात असल्याचे मत ओवैसी यांनी व्यक्त केले आहे. दुसरीकडे भाजपने कायदा आणि ड्रेस कोडचा हवाला देत हिजाबला चुकीचे म्हटले आहे.

देशाची गृहयुद्धाकडे वाटचाल

हिजाब प्रकरणावर देशभरात प्रतिक्रिया उमटत असताना आता या वादावर लालू प्रसाद यादव यांनी देखील वक्तव्य केले आहे. देश गृहयुद्धाकडे वाटचाल करत असल्याचे लालू प्रसाद यादव म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्यात घसरण सुरुच,चांदीही झाली स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Teacher Recruitment : 'राज्यात सरकारी-अनुदानित शाळांमध्ये तब्बल 18,500 नवीन शिक्षकांची भरती करणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

Latest Maharashtra News Updates : मोटारसायकल चोराला अटक, तीन बाईक्स जप्त

Explained: धावताना छातीत का दुखते? डॉक्टरांनी सांगितले 'हे' 5 कारण

उपमुख्यमंत्री शिंदेंनी कोणत्या अधिकाराखाली स्थगिती दिली? हायकोर्टाची विचारणा, बेकायदा इमारत प्रकरणी अडचणी वाढणार

SCROLL FOR NEXT