Himachal Assembly Polls aaditya vikram singh resigned from congress  esakal
देश

Himachal Assembly Polls: उमेदवारांची यादी जाहीर होताच काँग्रेसमध्ये बंडखोरीचे वारे

सकाळ डिजिटल टीम

हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने ४६ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. एकिकडे पक्षवाढीसाठी राहुल गांधी देशभर फिरत आहेत. तर दुसरीकडे उमेदवारांची यादी जाहीर होताच बंडखोरीचे वारे वाहू लागले आहे. काँग्रेस नेते आदित्य विक्रम सिंह यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे काँग्रेसमधील कलह चव्हाट्यावर आला आहे. (Himachal Assembly Polls aaditya vikram singh resigned from congress Announces 46 Candidates )

पक्ष वाढीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देश पिंजून काढत आहेत. तर दुसरीकडे अनेक दिवसांपासून रखडलेल्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीचा निकाल देखील आज लागणार आहे. अशा परिस्थितीत पक्षाला गळती लागली आहे.

कुल्लूच्या बंजार मतदारसंघातून तिकीट न मिळाल्याने आदित्य विक्रम सिंह यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आदित्य विक्रम सिंह हे भाजपमध्ये जाणार असल्याचा चर्चेला उधाण आलं आहे. मात्र, त्यांनी पुढे कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबद्दल अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही.

२०१७ मध्ये झालेल्या निवडणूकीत काँग्रेसकडून आदित्य विक्रम सिंह मैदानात उतरले होते. मात्र, त्यांना पराभव स्विकारावा लागला होता.

दरम्यान, आगामी निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून हिमाचल प्रदेशमधील विधानसभेच्या 68 जागांसाठी निवडणूकांची घोषणा करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेश विधानसभेची मुदत 8 जानेवारी 2023 ला संपत असून त्या अगोदर निवडणूका घेतल्या जाणार आहेत.

हिमाचल मधील एकूण 68 जागांपैकी एससीसाठी 17 जागा आणि एसटीसाठी 3 जागा राखीव आहेत. तर हिमाचलमधील मतदान हे एकाच टप्प्यात घेतलं जाणार आहे. 12 नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर 8 डिसेंबरला निवडणूकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP Dog Life Imprisonment : ऐकावं ते नवलच! आता उत्तर प्रदेशात कुत्र्यालाही होणार जन्मठेप; योगी सरकारचा नवा निर्णय

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डबल डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

Thane Traffic: घोडबंदर मार्गावर दिवसा 'या' वाहनांना नो एन्ट्री, एकनाथ शिंदे यांचे निर्देश जारी

OCD Explained: OCD म्हणजे फक्त स्वच्छतेशी संबंधित नाही! डॉक्टरांनी सांगितले ऑब्सेसिव्ह कंपलसिव्ह डिसॉर्डरचे खरे स्वरूप

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

SCROLL FOR NEXT