देश

परिवहनमंत्र्यांच्या पत्नीचे दागिने चोरीला

वृत्तसंस्था

चंदीगड : हिमाचल प्रदेशच्या परिवहनमंत्र्यांच्या पत्नीचे दागिने आणि रोख रक्कम असलेली बॅग चोरीला गेल्याची घटना घडली. गोविंद ठाकूर असे संबंधित मंत्र्याचे नाव आहे. त्यांची पत्नी रजनी ठाकूर या चंदीगडच्या सेक्टर-8 मार्केटमध्ये शॉपिंगसाठी गेल्या होत्या. त्यादरम्यान ही चोरी झाली. 

रजनी ठाकूर यांचे वाहनचालक गाडीतच बसून होते. त्यावेळी चोरांनी त्या वाहनचालकाला तुमचे पैसे खाली पडले आहेत, असे खोटे सांगितले. त्यानंतर वाहनचालक गाडीबाहेर आला. याचाच फायदा घेत चोरांनी कारमधील वस्तू आणि रक्कम चोरून नेली. या गाडीमध्ये रजनी ठाकूर यांची बॅग होती. या बॅगेमध्ये तब्बल अडीच लाख रुपये रोख आणि काही दागिने होते. चोरट्यांनी फसवून ही बॅग लंपास केली. या घटनेनंतर रजनी ठाकूर यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

दरम्यान, या तक्रारीनंतर पोलिसांनी वाहनचालकाची अधिक चौकशी केली असता त्याने घडलेला सर्व प्रकार सांगितला. आता पोलिसांचा तपास त्यादृष्टीने सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT