Himachal Pradesh Esakal
देश

HP Election Results 2022 : मतमोजणी संपली! कॉंग्रेसला ४० तर भाजपला २५ जागांवर विजय

हिमाचलमध्ये 68 मतदान केंद्रांवर सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होणार

सकाळ डिजिटल टीम

मतमोजणी संपली! कॉंग्रेसला ४० तर भाजपला २५ जागांवर विजय

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी संपली असून या निवडणुकीत काँग्रेसला 40 जागांवर विजय मिळाला असून भाजपला 25 आणि अपक्षांना 3 जागा मिळाल्या आहेत.

जयराम ठाकूर यांचा मोठ्या फरकाने विजय

हिमाचल प्रदेशचे सीएम जयराम ठाकूर सेराज सीटवरून विजयी झाले आहेत, त्यांनी काँग्रेसचे प्रतिस्पर्धी चेत राम यांचा 38,183 मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला आहे

 भाजपचा 1% पेक्षा कमी मतांनी पराभव, मावळते मुख्यमंत्री म्हणाले...

भाजप हिमाचल प्रदेश निवडणुकीत 1% पेक्षा कमी मतांनी पराभूत झाला आणि कॉंग्रेसने राज्याच्या इतिहासात सर्वात कमी मतांनी विजय मिळवला. पण मी मतदानाच्या निकालांचा आदर करतो. आशा आहे की काँग्रेस लवकरच मुख्यमंत्री निवडेल आणि राज्यासाठी काम करण्यास सुरवात करेल अशी प्रतिक्रियी हिमाचल प्रदेशचे मावळते मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी दिली आहे.

कॉंग्रेस २३ तर भाजप १३ जागांवर आघाडीवर, वाचा डिटेल्स

हिमाचल प्रदेशात काँग्रेसने 16 जागा जिंकल्या आहेत तर 23 जागांवर आघाडी घेतली आहे, मतमोजणी सुरू असताना भाजपने 13 जागा जिंकल्या आणि सध्या 13 जागांवर भाजप आघाडीवर आहे.

थोड्याच वेळात राज्यपालांकडे माझा राजीनामा देईन - जयराम ठाकूर

थोड्याच वेळात राज्यपालांकडे माझा राजीनामा देईन, अशी माहिती हिमाचल प्रदेशचे मावळते मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी सांगितले आहे

हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष सुरू 

हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष सुरू झाला आहे. काँग्रेस 39 जागांच्या आघाडीवर आहे. तर भाजप 21 जागांवर आहे. तर अपक्ष 3 जागांवर आहेत. हे सर्व आकडे पाहता कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे.

'हिमाचल'चा पहिला निकाल हाती; CM जयराम ठाकूर यांनी जिंकली सहाव्यांदा निवडणूक

बहुचर्चित हिमाचल निवडणुकीचा पहिला निकाल समोर आलाय. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी सेराज विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. मुख्यमंत्री जयराम ठाकूर 20 हजारांहून अधिक मतांनी विजयी झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, राज्यातील ट्रेंडमध्ये भाजप अजूनही पिछाडीवर असून काँग्रेस पक्ष 38 जागांवर आघाडीवर आहे. 68 विधानसभा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीची मतमोजणी आज होत असून या निवडणुकीत भाजप (BJP) आणि काँग्रेसमध्ये निकराची लढत पाहायला मिळत आहे.

हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, विनोद तावडेंची बैठक सुरू

हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, विनोद तावडेंची बैठक सुरू झाली आहे. हिमाचलमध्ये लढत एकदम रंगत होत आहे. अशातच काठावर आकडे असल्यामुळे इतर शक्यतांची पडताळणी सुरू झाली आहे.

हिमाचलमध्ये काँग्रेस स्पष्ट बहुमत मिळवेल : नाना पाटोले 

हिमाचलमध्ये काँग्रेस स्पष्ट बहुमताचं सरकार बनवेल आणि लोकसभेत चांगलं प्रदर्शनही करेल. भय निर्माण करण्याचं काम जाणीवपूर्वक झालं आहे.

हिमाचलमध्ये काँग्रेस विजयाच्या जवळ; काँग्रेस भाजपमध्ये चढाओढ

हिमाचलप्रदेश मध्ये काँग्रेस 38 जागांवर आहे तर भाजप 26 आणि अपक्ष 3 जागांवर आहे. आपला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे ही लढत काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्येच दिसून येत आहे.

हिमाचल प्रदेशचा पहिला निकाल हाती 

हिमाचल प्रदेशचा पहिला निकाल हाती आला आहे. सुंदरनगरमधून भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे. सुंदरनगरमधून भाजपचा उमेदवार राकेश कुमार विजयी झाले आहेत.

हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस भाजपमध्ये काँटे की टक्कर; अपक्ष ठरवणार भविष्य?

हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस भाजपमध्ये काँटे की टक्कर दिसून येत आहे. तर अपक्ष यामध्ये महत्वाचा मुद्दा ठरेल असे दिसून येत आहे. काँग्रेस भाजपमध्ये अपक्षांची बाजू मोलाची ठरणार आहे.

काँग्रेसने मारली मजल; भाजप पिछाडीवर 

हिमाचालमध्ये काँग्रेसने मजल मारली आहे. तर भाजप पिछाडीवर गेले आहे. आता काँग्रेस 35 जागांवर आहे तर भाजप 32 जागांवर उत्सुकता शिगेला पोहचत आहे. ही अटीतटीची लढत आणखी रंजक होण्याची शक्यता आहे.

हिमाचलमध्ये भाजपच जिंकणार; मोहित कंबोज 

हिमाचालमध्ये भाजप 33 जागांवर आहे तर काँग्रेस 34 जागांनी आघाडीवर आहे. ही लढत जोराची होण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाने अशीच आघाडी ठेवली तर हिमाचालमधील राजकीय दृश्य बदलण्याची शक्यता आहे. अशातच भाजप नेते मोहित कंबोज यांनी हिमाचालमध्ये भाजपच जिंकणार असं ट्विट केलं आहे.

हिमाचालमध्ये काँग्रेसची  मोठी आघाडी; तर आपला एकही जागा नाही 


हिमाचालमध्ये भाजप 33 जागांवर आहे तर काँग्रेस 34 जागांनी आघाडीवर आहे. ही लढत जोराची होण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाने अशीच आघाडी ठेवली तर हिमाचालमधील राजकीय दृश्य बदलण्याची शक्यता आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये भाजपने केला श्रीगणेशा

हिमाचल प्रदेशमध्ये भाजपने केला श्रीगणेशा केला आहे. हिमाचालमध्ये भाजप 17 जागांवर आहे. तर आयएनसी 13 जागांवर आहे. तर आपला आणखी एकही जागा मिळाली नाही.

हिमाचलमध्ये मतमोजणीला सुरवात

हिमाचालमध्ये मतमोजणीला सुरवात झाली आहे. या मतमोजणी केंद्रावर 10 हजार सुरक्षा रक्षक, निवडणूक अधिकारी आणि इतर कर्मचारी उपस्थित आहेत. 59 ठिकाणी तयार करण्यात आलेल्या 68 मतदान केंद्रांवर सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू झाली आहे.

हिमाचलमध्ये 68 मतदान केंद्रांवर मोजणी, मोठा बंदोबस्त

हिमाचल प्रदेशात निवडणुकीसाठी 10 हजार सुरक्षा रक्षक, निवडणूक अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांच्या देखरेखीत मतमोजणी होणार आहे. 59 ठिकाणी तयार करण्यात आलेल्या 68 मतदान केंद्रांवर सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. सकाळी 8 वाजता पोस्टल बॅलेटची मोजणी होईल. त्यानंतर 8.30 वाजता ईव्हीएममशीन उघडल्या जातील.

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये 12 नोव्हेंबरला मतदान झाले होते. हिमाचल प्रदेशमध्ये भाजपची सत्ता आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजप सत्ता राखणार की काँग्रेस बाजी मारणार? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

London Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान दुर्घटनेची आता लंडनमध्ये पुनरावृत्ती

ENG vs IND: लॉर्ड्सवर पुन्हा ड्रामा! आकाश दीपनं फिजिओला बोलावलं, स्टोक्सने केएल राहुलसमोर टाळ्या पिटल्या; Video

Wimbledon 2025 Final: यानिक सिनरने वचपा काढला,अल्काराजला हरवत जिंकलं विम्बल्डनचं विजेतेपद

ENG vs IND: भारतासमोर सोप्पं लक्ष्य, पण इंग्लंडनेही कसली कंबर; 3rd Test जिंकण्यासाठी शेवटच्या दिवसाचं कसं समीकरण?

शाळा ५ किमी अंतरावर असेल तर विद्यार्थ्याला ६००० रुपये मिळणार, सरकारची मोठी घोषणा, योजनेचा लाभ कसा मिळवायचा?

SCROLL FOR NEXT