Himachal Pradesh Assembly Election esakal
देश

HP Assembly Election : बंडखोरांवर भाजपची मोठी कारवाई; 5 नेत्यांना केलं निलंबित

बंडखोरी करणाऱ्या नेत्यांवर भाजपनं मोठी कारवाई सुरू केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

बंडखोरी करणाऱ्या नेत्यांवर भाजपनं मोठी कारवाई सुरू केली आहे.

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी (Himachal Pradesh Assembly Election) बंडखोरी करणाऱ्या नेत्यांवर भाजपनं कारवाई सुरू केलीय. राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षानं (BJP) सोमवारी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविल्याबद्दल प्रदेश उपाध्यक्षांसह आपल्या पाच बंडखोर नेत्यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून निलंबित केलंय.

निलंबित भाजप नेत्यांमध्ये माजी आमदार तेजवंत सिंह नेगी 'किन्नौर', किशोरी लाल 'अन्नी', मनोहर धीमन 'इंदोरा', के एल ठाकूर 'नालागढ' आणि पक्षाच्या हिमाचल प्रदेश युनिटचे उपाध्यक्ष कृपाल परमार यांचा समावेश आहे. या नेत्यांना भाजपनं तिकीट नाकारलं आहे. यानंतर हे सर्वजण आपापल्या जागेवरून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. माजी राज्यसभा सदस्य परमार हे फतेहपूर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.

पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवल्याबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुरेश कश्यप यांनी या नेत्यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून सहा वर्षांसाठी निलंबित केलंय. यापूर्वी 12 हून अधिक भाजप नेत्यांनी 12 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र, सर्वोच्च नेतृत्वाच्या मध्यस्थीनंतर माजी खासदार महेश्वर सिंह, युवराज कपूर आणि धर्मशाला ब्लॉक अध्यक्ष अनिल चौधरी यांनी अपक्ष म्हणून आपली नावं मागं घेतली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

Kannad Teacher Credit Society: आमसभेत आर्थिक अनियमिततेचे आरोप; चर्चा सुरू असतानाच राष्ट्रगीताने सभा गुंडाळल्याचा दावा

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

Marathi News Live Updates : पैठणमधील हर्षी खुर्द येथे सव्वीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवले

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT