Himachal Result 2022 esakal
देश

Himachal Pradesh Result: 'हिमाचल'चा पॅटर्नच वेगळा; काँग्रेस पुढे सरकण्याचं कारण काय?

संतोष कानडे

Himachal Pradesh Assembly Election Result 2022

हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण सध्या काँग्रेस आघाडीवर आहे. तब्बल सहा जागांनी सध्या काँग्रेस पुढे आहे. हिमाचलमध्ये विधानसभेच्या ६८ जागा आहेत. काँग्रेस ३६, भाजप ३० तर २ ठिकाणी इतर आघाडीवर आहे.

सध्या हिमाचल प्रदेशमध्ये भाजपची सत्ता आहे. येथील लोक सत्ताधारी पक्षाला पुन्हा संधी देत नाही, असा एक पॅटर्न आहे. यावेळीदेखील तोच पॅटर्न कायम राहिल, असं बोललं जात आहे. कारण फारकाही कष्ट न केलेला काँग्रेस इथे आघाडीवर आहे.

२०१७ मध्ये हिमाचलमध्ये भाजपची सत्ता आली. त्यापूर्वी २०१२मध्ये काँग्रेसने हिमाचलचा गड काबिज केला होता. तेव्हा ६८ पैकी काँग्रेसचे ३६, भाजपचे २६ तर अपक्ष ६ सदस्य विधानसभेमध्ये निवडून गेले होते. विरभद्र सिंग हे त्यावेळी मुख्यमंत्री होते.

त्यापूर्वी २००७मध्ये हिमाचल प्रदेशच्या विधानसभेत भाजपचं संख्याबळ जास्त होतं. सत्तेविरोधी लाटेवर स्वार होत भाजपने ६८ पैकी ४१ जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसला २३ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. उरलेल्या चार जागांपेकी बहुजन समाज पार्टीने एक आणि इतरांना तीन जागा मिळाल्या. १९९० नंतर भाजपने स्वबळावर सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी २००७ ते २०१२ पर्यंत प्रेमकुमार धुमल हे मुख्यमंत्री राहिले. धुमल यांचा बमसन हा विधानसभा मतदारसंघ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानला जय शाह अन् ICC ची भीती! Asia Cup वर बहिष्कार टाकण्याचा विचार सोडला?

Latest Marathi News Updates : जोगेश्वरी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर दुचाकी ला लागली आग

Side Effects of Overuse of Antibiotics: प्रतिजैविक औषधांचा अंदाधुंद वापर धोकादायक तज्‍ज्ञ डॉक्‍टरांच्या परिषदेत विस्‍तृत चर्चा

Barshi Fraud News : शेअर बाजारात गुंतवणुकीचे अमिष; बार्शीत १ कोटी ७० लाख रुपयांची फसवणूक, तीन महिलांसह सात जणांवर गुन्हा

Pune Traffic : शहरात पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT