Pratibha Virbhadra Singh Himachal Pradesh Assembly Election Results 2022 esakal
देश

Himachal Election : निकाल राहिला लांब कॉंग्रेसच्या 'या' नेत्या म्हणतात मीच होणार मुख्यमंत्री

'आम्ही सरकार बनवत आहोत आणि जनतेलाही तेच हवं आहे.'

सकाळ डिजिटल टीम

'आम्ही सरकार बनवत आहोत आणि जनतेलाही तेच हवं आहे.'

Himachal Pradesh Assembly Election Results 2022 : हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निकालापूर्वीच काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा प्रतिभा वीरभद्र सिंह (Pratibha Virbhadra Singh) ह्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सामील झाल्या आहेत.

आपली भूमिका स्पष्ट करताना मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह म्हणाल्या, वीरभद्र सिंह यांचं कुटुंब आणि वारसा दुर्लक्षित करता येणार नाही. राज्याच्या विकासाचा वारसा पुढं नेण्यासाठी वीरभद्र कुटुंबातील कोणीतरी राज्याच्या जनतेला हवं आहे. जर या निवडणुकीत पक्षानं विजय मिळवला तर मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

वीरभद्र सिंह यांचं गेल्या वर्षी निधन झालं होतं. त्यांचा मुलगा विक्रमादित्य यांनी 12 नोव्हेंबर रोजी शिमला ग्रामीणमधून निवडणूक लढवली होती. त्यांची आई आणि मंडीच्या खासदार प्रतिभा सिंह या विधानसभा निवडणुकीत उमेदवार नव्हत्या. हिमाचल प्रदेश विधानसभेचे निकाल आज जाहीर होत आहेत. मात्र, निकालापूर्वी माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी म्हणाल्या, आम्हाला 40 च्या वर जागांची अपेक्षा आहे. त्या 42 ही असू शकतात आणि 45 च्याही पुढं जाऊ शकतात. आम्ही सरकार बनवत आहोत आणि जनतेलाही तेच हवं आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा पुढं म्हणाल्या, वीरभद्र सिंह नसल्यामुळं पक्षाचं मोठं नुकसान झालं असलं, तरी काँग्रेसच्या प्रत्येक पोस्टरवर त्यांचा फोटो आहे, त्यामुळं ही निवडणूक आम्हीच जिंकणार आहोत. मुख्यमंत्रिपदासाठी जनता आणि बहुसंख्य आमदारांना काय हवं आहे ते पक्ष पाहील. मी दावा करत नाहीये, पण लोकांना काय हवंय हे पाहावं लागेल आणि बहुतांश आमदारांना काय हवंय याचा विचार केला जाईल. आम्ही हायकमांडलाही हस्तक्षेप करायला सांगू. मला खात्री आहे की, लोकांना काय हवंय ते बघतील. निकाल आल्यानंतर हायकमांडला अंतिम निर्णय घेण्याची परवानगी द्यावी, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT