Himachal Pradesh Assembly Election Results 2022 esakal
देश

Himachal Election : 'हिमाचल'मध्ये कोण मारणार बाजी? काही तासांत चित्र होणार स्पष्ट, 'इथे' पहा निकाल

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालांची मतमोजणी सुरु झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालांची मतमोजणी सुरु झाली आहे.

Himachal Pradesh Election Results on Election Commission of India : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालांची मतमोजणी आज, गुरुवार 8 डिसेंबर रोजी होत आहे. प्रथम पोस्टल मतपत्रिकांची मोजणी सुरू झालीय. एक्झिट पोलमध्येही भाजप आणि काँग्रेसमध्ये कडवी लढत पहायला मिळत आहे.

अशा स्थितीत दोन्ही पक्ष सत्तेत येत असल्याचा दावा करत आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या 68 जागांसाठी 12 नोव्हेंबरला मतदान झालं होतं. यावेळी 75 टक्क्यांहून अधिक मतदान झालं. राज्यात 2017 च्या विधानसभा निवडणुकीत 75.57 टक्के मतदान झालं होतं.

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवरही तपासले जाऊ शकतात. निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइट results.eci.gov.in वर जाऊन प्रत्येक जागेचा निकाल तपासता येईल. वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 8 वाजल्यापासून ट्रेंड येण्यास सुरुवात होईल. आधी निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर जा आणि डिसेंबर 2022 च्या विधानसभा मतदारसंघाच्या सर्वसाधारण जागांवर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही संबंधित राज्याचे निकाल पाहू शकता.

ई-सकाळ आणि साम टिव्ही चॅनलवर तुम्ही सकाळी 7 वाजल्यापासून लाईव्ह कव्हरेज पाहू शकता. esakal.com, saamtv.com या वेबसाइटवरही क्षणोक्षणी अपडेट्स उपलब्ध असतील.

'एक्झिट पोल'ची स्थिती काय?

Himachal Pradesh Exit Poll 2022 मध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये निकराची लढत पाहायला मिळाली. आज तक-अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला 42 टक्के, काँग्रेसला 44 टक्के आणि ‘आप’ला 2 टक्के मतं मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हिमाचलमध्ये भाजपला 24-34 जागा मिळतील, तर काँग्रेसला 30-40 जागा मिळतील असा अंदाज आहे. इतरांना 4-8 जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, आम आदमी पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. हिमाचलमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी एकूण 68 जागांपैकी 35 जागांची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT