Congress Leader GS Bali esakal
देश

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जीएस बाली यांचं निधन

सकाळ डिजिटल टीम

हिमाचल प्रदेशातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जीएस बाली (Congress Leader GS Bali) यांचे आज शनिवारी वयाच्या 67 व्या वर्षी निधन झाले.

हिमाचल प्रदेशातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जीएस बाली (Congress Leader GS Bali) यांचे आज शनिवारी वयाच्या 67 व्या वर्षी निधन झाले. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. दिल्लीतील एम्समध्ये (Delhi AIIMS) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जीएस बाली यांचं पार्थिव शनिवारी एअर अॅम्ब्युलन्सद्वारे दिल्लीहून कांगडा येथे नेण्यात येणार आहे. जीएस बाली यांचा मुलगा रघुबीर सिंह बाली यांनी वडिलांच्या निधनाची माहिती दिलीय.

रघुबीर सिंह बाली म्हणाले, अतिशय दुःखी अंतःकरणानं कळवावं लागतंय, की माझे वडील आणि तुम्हा सर्वांचे प्रिय जीएस बाली आता आमच्यात राहिले नाहीत. काल रात्री त्यांनी दिल्लीतील एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला आहे.

जीएस बाली नगरोटा बगवां विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. 1998 मध्ये त्यांनी पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विधानसभेत पोहोचले. त्यानंतर 2003, 2007 आणि 2012 मध्ये त्यांना चौथ्यांदा आमदार होण्याची संधी मिळाली. बाली 2003 मध्ये परिवहन मंत्रीही होते. ते हिमाचल सिव्हिल रिफॉर्म्स सभेचे संस्थापक प्रमुखही होते. यासोबतच बाली हिमाचल सोशल बॉडी फेडरेशनचे उपाध्यक्ष आणि नंतर अध्यक्षही राहिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

SCROLL FOR NEXT