Himachal Pradesh Election
Himachal Pradesh Election  sakal
देश

Himachal Pradesh Election 2022 : आता हिमाचलमध्येही भाजपचे 'मिशन लोटस'? काँग्रेस नेते म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते आणि ठीयोग विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार कुलदीप सिंह राठोड यांनी दावा केला आहे की, हिमाचल काँग्रेसचे सर्व नेते एकत्र आहेत. हिमाचलमध्ये भाजपचे मिशन लोटस अपयशी ठरेल, असे ते म्हणाले.

राठोड म्हणाले की, इतर राज्यांच्या इतिहासावरून भाजप फोडाफोडीचे राजकारण करत असल्याचे दिसून येते, मात्र हिमाचल प्रदेशात भाजपचा हा प्रयत्न यशस्वी होणार नाही. भाजपचा फोडाफोडीच्या राजकारणाचा प्रयत्न हिमाचल प्रदेशात फसणार असल्याचं राठोड यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : Moonlighting And Tax Benefits : ‘मूनलायटिंग’च्या वाटे, नको ‘टॅक्स’चे काटे!

यावेळी कुलदीप सिंह राठोड म्हणाले की, हिमाचल काँग्रेसचे सर्व नेते एकत्र आहेत. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी लढत नाही. हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची निवड विहित प्रक्रियेनुसार केली जाईल. ते म्हणाले की, भाजपने काँग्रेस पक्षाची चिंता करण्याची गरज नाही. काँग्रेस हायकमांड ज्या नेत्यावर विश्वास ठेवेल तोच राज्याचा मुख्यमंत्री होईल.

हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष सुरू झाला आहे. काँग्रेस 39 जागांच्या आघाडीवर आहे. तर भाजप 21 जागांवर आहे. तर अपक्ष 3 जागांवर आहेत. हे सर्व आकडे पाहता कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे.

काँग्रेस कडून 1) मुकेश अग्निहोत्री 2)सुखविंदर सिंह सुक्खू 3)प्रतिभा सिंह या नावांची चर्चा सुरू आहे. हिमाचल प्रदेश येथील एकंदरीत परिस्थिति पाहता काँग्रेसची सत्ता येणार हे दिसून येत आहे. परंतु मुख्यमंत्री पदावर कोण बसणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident: आमदार टिंगरेंनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर अजितदादांचा पुणे पोलीस आयुक्तांना फोन; काय झाली चर्चा?

HSC Result: बारावीत सर्व विषयात १०० टक्के गुण मिळवून तनिषानं घडवला इतिहास! असा केला अभ्यास

Arjun Tendulkar: सचिनचा मुलगा नरसोबा वाडीत काय करतोय ? अर्जुन पोहचला दत्ताच्या चरणी

BSE Market Cap: भारतीय शेअर बाजाराने रचला इतिहास; बीएसईवर कंपन्यांचे मार्केट कॅप प्रथमच 5 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे

Pune Accident: आरोपी अल्पवयीन तरुणाने त्या रात्री पार्टीसाठी किती पैसे खर्च केले? धक्कादायक आकडा समोर

SCROLL FOR NEXT