Himachal Pradesh Floor Test 
देश

Himachal Pradesh Floor Test : भाजपचा आता नवा डाव? हिमाचलमध्ये केली विश्वासदर्शक ठरावाची मागणी; कारण...

हिमाचल प्रदेशमध्ये सध्या काँग्रेसचं सरकार असून या सरकारविरोधात भाजपनं विश्वासदर्शक ठराव घेण्याची मागणी राज्यापालांना भेटून केल्याची माहिती आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : देशात अनेक राज्यांमध्ये आमदार फोडाफोडीमुळं सत्ता बदल झाल्यानंतर भाजपनं आता नव्या डावाला सुरुवात केली आहे. हिमाचल प्रदेशातील काँग्रेस सरकारविरोधात विश्वास दर्शक ठरावाची मागणी भाजप राज्यपालांना भेटून केली आहे. भाजपनं असं करण्यामागं आता एक मोठं कारणही समोर आहे. (himachal pradesh floor test demaned by bjp to governer new strategy after debacle in many states)

भाजपचे वरिष्ठ नेते आणि विरोधीपक्ष नेते जयराम ठाकूर यांनी पक्षाचे आमदारांसह बुधवारी राज्यपाल शिवप्रताप शुक्ला यांनी राजभवनवर जाऊन भेट घेतली. सुत्रांच्या माहितीनुसार, भाजपनं राज्यपालांना भेटून हिमाचल प्रदेशच्या विधानसभेत विश्वासदर्शक ठराव घेण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिख्खू यांनी बहुमत गमावल्याचं सांगत त्यांनी ही मागणी केल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी बहुमत गमावल्याचं ठामपणे भाजपकडून सांगितलं जात आहे त्यामागचं कारण म्हणजे काल झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसकडं संख्याबळ असतानाही त्यांचा उमेदवार अभिषेक मनु सिंघवी यांचा पराभव झाला. यामध्ये काँग्रेसच्या ६ आणि अपक्षांच्या ३ आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचं सांगितलं जात आहे. कारण क्रॉस वोटिंगमुळं संख्याबळ असतानाही भाजप उमेदवार आणि काँग्रेस उमेदवाराला समान ३४ मतं मिळाली होती. त्यानंतर लकी ड्रॉ काढण्यात आला यामध्ये सिंघवी यांचा पराभव झाला.

याचाच अर्थ काँग्रेसचं विधानसभेत ४३ इतकं संख्याबळ आहे तर भाजपचं २५ इतकं आहे. पण तरीही काँग्रेसच्या आमदारांनी भाजपच्या बाजूनं मतदान केल्यानं काँग्रेससाठी हा जोरदार धक्का बसला आहे. त्यामुळेच राज्यात काँग्रेस आमदारांमध्ये नाराजी असल्याचं सांगत भाजपनं सरकारवर आमदारांचा विश्वास नसल्याचं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT