rahul Gandhi 
देश

Gujarat Election Result 2022 : मेहनत...; गुजरातमधील दारुण पराभवावर राहुल गांधींची प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली -हिमाचल प्रदेशमधील काँग्रेसचा विजय आणि गुजरात विधानसभा निवडणुकीत पक्षाचा दारुण पराभव झाला. यावर आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गुजरातमध्ये काँग्रेसला २० जागाही जिंकता आल्या नाहीत. (Himachal Pradesh Gujarat Election Result 2022)

राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटलं की, हिमाचलमधील निर्णायक विजयासाठी हिमाचलच्या जनतेचे मनकपूर्वक धन्यवाद. तर गुजरातच्या पराभवावर ते म्हणाले की, आम्ही यापुढेही लढत राहू. सर्व काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन. तुम्ही घेतलेले कष्ट आणि झोकून देण्याची प्रवृत्ती अभिनंदनास पात्र आहेत. काँग्रेसने दिलेले सर्व आश्वासन आम्ही पूर्ण करू असा विश्वासही राहुल गांधी यांनी व्यक्त केला.

गुजरातमधील दारुण पराभवाबद्दल राहुल गांधी म्हणाले, "गुजरातच्या जनतेचा जनादेश आम्ही नम्रपणे स्वीकारतो. आम्ही पुनर्रचना करू, कठोर परिश्रम करू आणि देशाच्या आदर्शांसाठी आणि राज्यातील जनतेच्या हक्कांसाठी लढा देत राहू. गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला असून भाजपने सर्वाधिक जागा जिंकून इतिहास रचला आहे.

गुजरातमध्ये भाजपने एकतर्फी विजय मिळवत 142 जागांवर विजय मिळवला आहे. तर 14 जागांवर आघाडीवर आहे. त्याचवेळी पिछेहाट झालेल्या काँग्रेस पक्षाला आतापर्यंत 16 जागांवर विजय मिळवता आला. तर पहिल्यांदाच गुजरात निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या आम आदमी पक्षाने ४ जागा जिंकल्या आहे. तर चार अपक्षांनी विजय मिळवला आहे. हिमाचलप्रदेशात 40 जागांवर विजय मिळवला भाजपने आतापर्यंत 25 जागांवर विजय मिळवला. तर तीन अपक्षांचा विजय झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Reaction : ‘’मी जर पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता, तर..’’ ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!

IND vs ENG 2nd Test: बॅट निसटली, विकेट गेली! Rishabh Pant च्या आक्रमणाला ब्रेक, मोडला ५९ वर्षांपूर्वीचा विक्रम, Viral Video

कसलं भारी! आईच्या वाढदिवसाला लेकीने आणला मालिकांचा केक; जन्मदात्रीचा आनंद गगनात मावेना, Video Viral

Ashadhi Wari: दिंडीत मोकाट जनावरांचा हल्ला; अनेकजण जखमी, चिमुकल्यांचाही समावेश

Bhor Police : ५८ पैकी २९ पोलिस कार्यरत, ५० टक्के जागा रिक्त; भोर पोलिस ठाण्याची स्थिती

SCROLL FOR NEXT