Himachal Pradesh _ PM Modi 
देश

हिमाचल प्रदेश: भूस्खलनातील मृतांच्या कुटुंबियांना केंद्राकडून २ लाखांची मदत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली घोषणा

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशातील किनौर येथे भूस्खलनामुळं मृत्यूमुखी पडलेल्या ९ जणांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींना ५०,००० रुपयांची मदत देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली. तसेच ट्वीट करुन मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. (Himachal Pradesh landslide PM announces Rs 2 lakh aid from PMNRF aau85)

पंतप्रधानांनी ट्वीट करुन म्हटलं, "हिमाचल प्रदेशातील किनौर येथे झालेल्या भूस्खलनाची दुर्घटना अत्यंत दुःखद आहे. यामध्ये जीव गमावलेल्या लोकांच्या नातेवाईकांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. या दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांच्या उपाचारांची संपूर्ण व्यवस्था केली जात आहे. ते लवकरात लवकर बरे होवोत अशी प्रार्थना करतो"

हिमाचल प्रदेशातील किनौर जिल्ह्यात भूस्खलनाच्या तावडीत सापडल्यानं नऊ लोकांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. दरड कोसळल्याने दिल्ली आणि चंदीगडहून हिमाचल प्रदेशात फिरायला आलेल्या प्रवाशांच्या वाहनावर दगड कोसळले. यामुळे गंभीर जखमी होऊन त्यांना जीव गमवावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Milk Rates: कर्नाटकात दूध उत्पादकांना प्रतिलिटर ७ रुपये जादा; महाराष्ट्रातही दूध दरवाढ होणार का? पुण्यात आज बैठक

H-1B Visa Extension : अमेरिकेत नोकरी करणाऱ्या हजारो H-1B व्हिसाधारकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; भारतीयांवर थेट परिणाम

Supriya Sule: 'माझा भाऊ गेला, त्याच दिवशी विलीनीकरणाचा विषय संपला'; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

IND vs NZ 4th ODI Live: हायव्होल्टेज ड्रामा! गुरनूर ब्रार अन् न्यूझीलंडचा फलंदाज भिडले, विराटने गोलंदाजाला मागे खेचले नाहीतर... Video Viral

Latest Marathi News Live Update : पुण्यातील झेड ब्रीज खाली फटाक्यांमुळे टेम्पोला आग

SCROLL FOR NEXT