Assam CM Himanta Biswa Sarma esakal
देश

Himanta Sarma : हिमंता सरमांनी मागितली जाहीर माफी; ब्राम्हण-क्षुद्रांसंबंधीची 'ती' वादग्रस्त पोस्टही केली डिलीट

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर जाहीर माफी मागीतला आहे. भगवत गीतेमधील एका श्लोकाचे चुकीचे भाषांतर त्यांनी पोस्ट केले होते.

रोहित कणसे

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर जाहीर माफी मागीतला आहे. भगवत गीतेमधील एका श्लोकाचे चुकीचे भाषांतर त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केलं होतं. यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती. अनेक नेत्यांनी त्यांच्यावर जातीभेदाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला होता.

नियमीतपणे मी माझ्या सोशल मीडिया हँडलवर दररोज सकाळी भगवद्गीतेचा एक श्लोक अपलोड करतो. आजपर्यंत मी 668 श्लोक पोस्ट केले आहेत. अलीकडेच माझ्या टीम सदस्यांपैकी एकाने अध्याय 18 ओळ 44 मधील चुकीचे भाषांतर असलेला एक श्लोक पोस्ट केला. चूक लक्षात येताच त्यांनी ट्विट डिलीट केल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.

महापुरुष श्रीमंत शंकरदेव यांच्या सुधारणा चळवळीमुळे आसाम राज्य जाती विरहीत समाजाचे परिपूर्ण चित्र पाहायला मिळते. हटवलेल्या पोस्टमुळे कोणाचे मन दुखावले असेल तर मी मनापासून माफी मागतो, असेही सरमा म्हणाले आहेत.

पोस्टमध्ये काय म्हटलं होतं?

राजकीय वादाला तोंड फुटलं त्या पोस्टमध्ये गीतेनुसार ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या इतर तीन जातींची सेवा करणे हे क्षुद्रांचे कर्तव्य आहे, असा उल्लेख करण्यात आला होता.

नुकत्याच हटवलेल्या पोस्टमध्ये, आसामच्या मुख्यमंत्र्यांनी समाजाविषयीची त्यांची दृष्टी स्पष्ट केली. "...शेती, गाई पालन आणि व्यापार ही वैश्यांची नैसर्गिक कर्तव्ये आहेत आणि ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांची सेवा करणे हे शूद्रांचे नैसर्गिक कर्तव्य आहे." संवैधानिक पद भूषवताना प्रत्येक नागरिकाला समान वागणूक देण्याची तुमची शपथ आहे. गेल्या काही वर्षांत आसामच्या मुस्लिमांना ज्या दुर्दैवी क्रौर्याचा सामना करावा लागला आहे, त्यावरून ते दिसून येते. हिंदुत्व हे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय यांच्या विरोधी आहे.

दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी या प्रकरणात आपली भूमिका मांडली आहे. नुकत्याच हटवलेल्या पोस्टमध्ये, आसामच्या मुख्यमंत्र्यांनी समाजाविषयीची त्यांची दृष्टी स्पष्ट केली. "...शेती, गाई पालन आणि व्यापार ही वैश्यांची नैसर्गिक कर्तव्ये आहेत आणि ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांची सेवा करणे हे शूद्रांचे नैसर्गिक कर्तव्य आहे."

संवैधानिक पद भूषवताना प्रत्येक नागरिकाला समान वागणूक देण्याची तुम्ही शपथ घेतली आहे. गेल्या काही वर्षांत आसामच्या मुस्लिमांना ज्या दुर्दैवी क्रौर्याचा सामना करावा लागला आहे, त्यावरून ते दिसून येते. हिंदुत्व हे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय यांच्या विरोधी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT