Himanta Biswa Sarma
Himanta Biswa Sarma Esakal
देश

CM हेमंत बिस्वा सरमा यांच्यावर गुन्हा दाखल करणार; रेवंत रेड्डी

सकाळ डिजिटल टीम

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma)यांनी गेल्या दोन दिवसांपासून राहुल गांधी (Rahul Gandhi) तसेच गांधी कुटुंबियां विरोधात अनेक आक्षेपार्ह विधाने केली आहेत. राहुल गांधी हे आधुनिक काळातील मोहम्मद अली जिना असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांचे हे वक्तव्य म्हणजे मातृत्वाचा अपमान आहे. याबद्दल तेलंगणातील ७०९ पोलिस ठाण्यात सरमा विरुद्ध गुन्हा नोंद करणार असल्याचे तेलंगणा प्रदेश काँग्रेसचे प्रमुख रेवंत रेड्डी (Revanth Reddy) यांनी ही माहिती दिली. (Himanta Biswa Sarma Update News)

तेलंगणातील ७०९ पोलिस ठाण्यात सरमा विरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याचे रेवंत रेड्डी यांनी सांगितले.

मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्यावर टीका करताना रेवंत रेड्डी म्हणाले, तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीने आज एक ठराव संमत केला आहे. या ठरावामध्ये मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांची पक्षातून हकालपट्टी करणार आहोत. याचबरोबर त्यांनी राहुल गांधी आणि त्यांच्या कुटुंबाविषयी अपशब्द बोलल्याबद्दल त्यांच्यावर तेलंगणामध्ये गुन्हा नोंद करण्यात येणार आहे. हिमंता बिस्वा सरमा यांच्या या वक्तव्याने मुंबईत काँग्रेस आक्रमक झाली आहे.

हिमंता बिस्वा सरमा यांचा आरोप

काँग्रेसने एक इकोसिस्टम विकसित केलीये आणि या इकोसिस्टममधील लोक भारताविरोधातल्या गोष्टी सहन करू शकतात, पण ते या गांधींविरुद्ध काहीही सहन करणार नाहीत. आज त्यांचं कोणी ऐकत नाही. मात्र, लोकांनी देशाशी एकनिष्ठ असले पाहिजे, विशिष्ट कुटुंबाशी नाही, असंही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT