Himanta Biswa Sarma statement Reorganization of Assembly constituencies Population should not only criterion sakal
देश

Himanta Biswa Sarma : केवळ लोकसंख्या हाच निकष नको; मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा

विधानसभा मतदार फेररचनेबाबत सरमा यांचे मत

सकाळ वृत्तसेवा

गुवाहाटी : विधानसभा मतदारसंघांची फेररचना करताना केवळ लोकसंख्या हाच निकष असू नये, असे आग्रही मत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी व्यक्त केले. इतरही निकष असावेत, पण ही प्रक्रिया आपल्याला संसदेने मंजूर केलेल्या कायद्यांनुसारच करावी लागते, अशी पुस्ती त्यांनी जोडली.

आसाममधील चार नवे जिल्हे आधीच्या जिल्ह्यांमध्ये विलीन करण्यात आले. या निर्णयास सरमा यांच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यानंतर सरमा म्हणाले की, जिल्हांच्या सीमा महत्त्वाचा निकष ठरतात. त्यामुळे आम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागतात.

मतदारसंघ फेरररनेसाठी नव्हे तर प्रशासकीय कारणांसाठी मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला. यामुळे फेररचनेवर थोडा परिणाम होईल, पण तो केवळ जनतेच्या कल्याणासाठीच असेल. ही प्रक्रिया २००१च्या जनगणनेनुसार केली जाऊ नये, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

निकषांबाबत आपला मुद्दा आणखी स्पष्ट करताना ते म्हणाले की, जेथे लोकसंख्या जास्त आहे तेथे सध्याच्या कायद्यानुसार कमी लोकसंख्येच्या ठिकाणाच्या तुलनेत जास्त सुविधा दिल्या जातात. याबाबत संसदेत ऊहापोह झाला पाहिजे. फेररचनेचा उपक्रम बिगरराजकीय घटनात्मक असून तो आकडेवारीवर आधारित तसेच न्याय्य असेल.

लोकसंख्या नियंत्रणाचे आदेश

आसाम सरकारने लोकसंख्या नियंत्रणासाठी जिल्ह्यांना आदेश दिले आहेत. काही भागांत याची अंमलबजावणी होत नसल्याचे त्यांनी नमूद केले.

आसाममध्ये बेकायदेशीर नागरिकांना शोधणे, मतदानासह त्यांचे अधिकार काढून घेणे आणि त्यांनी हकालपट्टी करणे असा मागण्यांसाठी जोरदार आंदोलन झाले. याशिवाय राष्ट्रीय नोंदणी पुस्तिका (एनआरसी) या वादग्रस्त कायद्यानंतरही स्थानिक जनतेच्या हक्क आणि भवितव्याचे रक्षण होऊ शकले नाही, असे सरमा पुढे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ind vs WI 2nd Test : कुलदीप यादवच्या चक्रव्यूहमध्ये फसला वेस्टइंडीज; २४८ धावांवर ऑलआऊट, फॉलोऑनची नामुष्की

Interpol Notices : रेड कॉर्नरपासून ब्लू कॉर्नरपर्यंत; इंटरपोल कधी अन् किती प्रकारच्या नोटीस जारी करते?

Whatsapp आणतंय खास फीचर; प्रोफाइलवर क्लिक करताच ओपन होणार Facebook, फेक अकाउंटला टाटा बाय बाय..कसं वापरायचं पाहा

Gaza Strip: उद्ध्वस्त घरे अन् अस्वस्थता; गाझा पट्टीत परतलेल्या हजारो पॅलेस्टिनींची भावना

Diwali Festival: बाजारपेठा गजबजल्‍या! दिवाळीच्या खरेदीची लगबग; आज गर्दी वाढणार

SCROLL FOR NEXT