Indian Navy
Indian Navy sakal media
देश

चीन-पाक नौदल सहकार्य भारतासाठी चिंतेचा विषय

कृष्ण जोशी

मुंबई : हिंदी महासागर-अरबी समुद्रात (Hindi ocean-Arabian sea) येणाऱ्या चिनी युद्धनौकांवर (china battleship) भारतीय नौदलाचे (Indian navy) लक्ष आहे; मात्र चीन व पाकिस्तानी नौदलाचे (Pakistan navy) सहकार्य आणि पाकिस्तानी नौदलाचे आधुनिकीकरण हा चिंतेचा विषय आहे, असे मत भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाचे मुख्याधिकारी व्हाईस ॲडमिरल अजेंद्र सिंह (vice admiral ajendra singh) यांनी आज व्यक्त केले.

बांगलादेश युद्धात मिळालेल्या विजयाच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजरा होणाऱ्या नौदल दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भारतीय सागरी हद्दीच्या आसपास येणाऱ्या चिनी युद्धनौकांवर भारतीय नौदलाचे लक्ष असते व आम्ही त्यांना त्याची जाणीवही करून देतो. गलवान पेचप्रसंगातही भारतीय नौदलाने वेगळ्या प्रकारे चिनी नौदलावर दडपण आणले होते. त्याचे प्रतिबिंब दोन देशांमधील चर्चेत पडले होते; मात्र सध्या वाढत असलेले पाकिस्तान व चिनी नौदलामधील सहकार्य हा चिंतेचा विषय आहे, असे अजेंद्र सिंह म्हणाले. आतापर्यंतच्या पाकिस्तानी युद्धनौका अपुऱ्या व जुन्या होत्या.

आता त्यांनी नव्या युद्धनौका घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या युद्धनौकांवर हेलिकॉप्टरही येत आहेत. भारतीय नौदलाची धोरणे ठरविताना या गोष्टीही विचारात घ्यायला हव्यात, असेही सिंह म्हणाले.अमली पदार्थांच्या व्यापारात पाकिस्तानचा मोठा हात असतो. आता हा व्यापार जमिनीवरून होण्याऐवजी सोप्या समुद्रमार्गाने केला जातो. त्याला अटकाव करण्यासाठी भारतीय नौदलाने आंतरराष्ट्रीय सहकार्याचे धोरण अवलंबले आहे. मच्छीमारांनाही प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

नौदलाचा विस्तार

दीर्घकालीन धोरणानुसार नौदलाचा विस्तार सुरू आहे. नव्या अत्याधुनिक वेगवान क्षेपणास्त्रवाहू नौका लवकरच नौदलात सहभागी होतील. सध्या ३९ लहान-मोठ्या जहाजांचे बांधकाम सुरू असून त्यातील ३७ जहाजे भारतात बांधली जात आहेत. आत्मनिर्भर धोरणानुसार यात खासगी कंपन्यांनाही सहभागी करून घेतले जात आहे, असेही व्हाईस ॲडमिरल अजेंद्र सिंह म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: मोदीजी हिंमत असेल तर संपवण्याचा प्रयत्न करुन बघा...; उद्धव ठाकरेंचं थेट आव्हान

PM Modi In Mumbai: राहुल गांधींना फक्त एक गोष्ट करायला सांगा; पंतप्रधान मोदींचे शरद पवारांना आव्हान

Raj Thackeray: मराठीला अभिजात दर्जा, मराठ्यांचा इतिहास अन् मुंबई-गोवा महामार्ग...; राज ठाकरेंनी मोदींकडं व्यक्त केल्या ७ अपेक्षा

RCB vs CSK : खेळ आरसीबी, सीएसके अन् पावसाचा; प्ले ऑफचा चौथा संघ ठरवणारा सामना

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर

SCROLL FOR NEXT