Amit-Shah 
देश

प्रांतीय भाषांवर हिंदी लादणार नाही - अमित शहा

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली - 'एक देश एक भाषा'ची कल्पना मांडून हिंदीचा जोरदार पुरस्कार करणारे गृहमंत्री अमित शहा यांच्या हिंदीबाबतच्या वक्तव्यानंतर दक्षिण भारतातून संतप्त प्रतिक्रियांची धग वाढताच आज तातडीने खुलासा करून "प्रांतीय भाषांवर हिंदी लादण्यात यावी, असे मी कधीही म्हटले नव्हते. केवळ मातृभाषेनंतरची द्वितीय भाषा म्हणून हिंदी शिकली जावी, एवढेच मी म्हटले होते,' असे सांगितले.

आपण बोललेल्या एखाद्या मुद्द्यावर जेमतेम 48 तासांत असा खुलासा करण्याची वेळ शहांवर प्रथमच आल्याचे मानले जाते. वाद इतका वाढला, की "मी स्वतः गैर हिंदीभाषक गुजरातमधून आलो आहे,' असा दाखला देण्याची वेळ त्यांच्यावर आली. हिंदीच्या मुद्द्यावर माझे म्हणणे नीट समजून न घेता ज्यांना फक्त राजकारणाच्या पोळ्या भाजून घ्यायच्या, त्यांनी त्या खुशाल भाजाव्यात, अशीही संतप्त भावना शहांनी व्यक्त केली आहे. हिंदीबाबतच्या मुद्द्यावर त्यांनी आज "एएनआय' वृत्तसंस्थेच्या माध्यमातून ट्‌विट करून खुलासा केला आहे.

"हिंदी दिना'च्या कार्यक्रमात बोलताना, अनेक भाषा व अनेक बोली या देशाची ताकद असली; तरी विदेशी भाषांच्या वर्चस्वाचा मुकाबला करण्यासाठी देशाची एकच भाषा असावी, यादृष्टीने हिंदी ही राज्यभाषेच्या रूपात स्वीकारली गेली. देशाला आता एका भाषेची जरुरी आहे, ज्यायोगे विदेशी भाषांना स्थान मिळणार नाही, असे शहा म्हणाले होते. मात्र, त्यांच्या त्या विधानानंतर दक्षिणेकडे विशेषतः तमिळनाडूत विरोध सुरू झाला. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही हिंदी लादण्याच्या मुद्द्याला तीव्र विरोध केला. खुद्द भाजपचे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनीही शहा यांच्या हिंदीबाबतच्या विधानाशी असहमती दर्शविली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Date Change : इंडियन प्रीमिअर लीग २६ मार्च ऐवजी 'या' तारखेला सुरू होणार; जाणून घ्या त्यामागचं महत्त्वाचं कारण...

Home Loan: ८ वर्षे EMI, ३ थकलेले हप्ते आणि ६० दिवस; १.२ कोटींचे घर गमावले: भारतीय स्वीकारण्यास नकार देत असलेले सर्वात कटू वास्तव

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

Shahu Mill Memorial : शाहू मिलचा स्मारक आराखडा लवकरच उच्चस्तरीय समितीकडे; राजेश क्षीरसागर यांनी आराखडा सादर करण्याचे दिले आदेश

Central Railway: सिमेंटने भरलेल्या मालगाडीचे ब्रेक अचानक निकामी, उतारावर नियंत्रण सुटलं अन्...; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT