Madhya Pradesh Love Jihad Case
Madhya Pradesh Love Jihad Case esakal
देश

पतीने फसवलं; धर्म लपवलाच, मौलवीसह दिराने केला बलात्कार

सकाळ डिजिटल टीम

सध्या देशभरात लव्ह जिहादचं प्रकरण चांगलंच तापू लागलंय.

सध्या देशभरात लव्ह जिहादचं (Love Jihad) प्रकरण चांगलंच तापू लागलंय. त्यातच आता मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर (Madhya Pradesh Gwalior) इथं लव्ह जिहादचं प्रकरण उघडं झाल्यानं वादाची शक्यता निर्माण झालीय. यातील तरुणीनं मुस्लीम (Muslim) तरुणानं नाव बदलून लग्न केल्याचा आरोप केलाय. जबरदस्तीनं धर्मांतरण करून तिच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आल्याचा आरोपही त्या तरुणीनं केलाय.

ग्वाल्हेरमधील (Gwalior) जनकगंज इथं ही पीडिता राहते. डबरा इथं राहणाऱ्या इमराननं (Imran) नाव बदलून पीडितेशी ओळख वाढवली. त्यानं आपलं नाव राजू जाटव असल्याचं सांगितलं. त्यानं पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर तो तिला घेऊन डबरा इथं गेला. तिथं त्यानं तिला बेशुद्ध करून तिच्यावर बलात्कार केला. या बलात्कारातून ती गर्भवती राहिली, तेव्हा इमराननं तिचा गर्भपात करवला. त्यानंतर ही तरुणी लग्नासाठी हट्ट करू लागली. तेव्हा त्यानं तिच्याशी लग्न केलं आणि पुन्हा त्याच्या घरी घेऊन आला.

राजूच्या घरी आल्यानंतर पीडितेला तो मुसलमान (Muslims) असल्याचं समजलं. लग्न झाल्यानं तरुणी त्याच्याच घरी राहू लागली. दरम्यान, ती पुन्हा गर्भवती झाल्यानंतर तिचा पुन्हा गर्भपात करण्यात आला. त्यानंतर तिचं जबरदस्तीनं धर्मांतरण करण्यात आलं. त्यानंतर तिचा इमरान उर्फ राजूशी निकाह करण्यात आला. त्यानंतर तरुणीनं इमरानविरुध्द तक्रार दाखल केलीय. इमरानच्या घरी असताना मौलवी आणि इमरानच्या भावानंही आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप तिनं केलाय. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली असून पोलीस इमरानसह आरोपींचा शोध घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT