Hindu leader Manikandan esakal
देश

Hindu Leader : भरचौकात हिंदुत्ववादी नेत्याची भोसकून हत्या; हात-पोटावर कोयत्याने सपासप वार

दागिन्यांचं दुकान बंद करून ते घरी जात असताना काही लोकांनी त्यांच्यावर कोयत्यानं वार केला.

सकाळ डिजिटल टीम

हल्लेखोरांनी आधी हिंदुत्ववादी नेत्यावर कोयत्यानं हल्ला केला आणि नंतर दगडफेक केली.

Crime News : तामिळनाडूतील मदुराई (Tamil Nadu Madurai) इथं एका हिंदुत्ववादी नेत्याची (Hindu leader) निर्घृण हत्या करण्यात आलीये. हिंदू मक्कल काची गटाच्या नेत्याची अज्ञातांनी भोसकून हत्या केली.

मणिकंदन (41 वय) असं मृताचं नाव आहे. दागिन्यांचं दुकान बंद करून ते घरी जात असताना काही लोकांनी त्यांच्यावर कोयत्यानं वार केला.

मृत मणिकंदन हे दक्षिण मदुराई येथील स्थानिक हिंदू गटाचे नेते होते. मणिकंदन यांचं एमके पुरम इथं दागिन्यांचं दुकान आहे. दुकान बंद करून ते घरी निघाले असता, त्यांच्यावर हल्ला करून अज्ञातांनी तेथून पळ काढला.

हल्लेखोरांनी आधी हिंदुत्ववादी नेत्यावर कोयत्यानं हल्ला केला आणि नंतर दगडफेक केली. त्यानंतर मणिकंदनला रुग्णालयात दाखल केलं असता, त्यांना मृत घोषित करण्यात आलं. स्थानिक पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत. या हत्येमागील कारण अद्याप पोलिसांना समजू शकलेलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT