gyanvapi mosque case sakal
देश

Gyanvapi Case : ‘ज्ञानवापी’ प्रकरणातून हिंदू याचिकाकर्त्याची माघार; विविध गटांकडून छळ होत असल्याचे कारण

विविध गटांकडून छळ होत असल्यानेच मी आणि माझ्या कुटुंबाने हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट

सकाळ वृत्तसेवा

वाराणसी : ज्ञानवापी प्रकरणात हिंदूंच्या बाजूने लढणाऱ्या प्रमुख याचिकाकर्त्यांपैकी एक असलेले जितेंद्रसिंह विसेन यांनी या प्रकरणाशी संबंधित सर्व याचिका मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे. विविध गटांकडून छळ होत असल्यानेच मी आणि माझ्या कुटुंबाने हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विसेन यांचे वकील शिवम गौर यांनी आधीच प्रकरणातून अंग काढून घेतले होते.

जितेंद्रसिंह विसेन हे विश्‍व वैदिक सनातन संघाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी एक निवेदन प्रसिद्ध करत आपला निर्णय जाहीर केला. ‘‘मी आणि माझे कुटुंबाने देशहित आणि धर्महित डोळ्यासमोर ठेवून ज्ञानवापी प्रकरणाशी संबंधी विविध न्यायालयांमध्ये दाखल केलेल्या याचिका आता मागे घेत आहोत.

आम्हाला हिंदूंसह विविध गटांकडून त्रास दिला जात असून आमचा अपमानही केला गेला आहे. अशा परिस्थितीत मर्यादित पाठबळ आणि स्रोत असल्याने धर्मासाठीची ही लढाई मी लढू शकत नाही,’’ असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. हे ‘धर्मयुद्ध’ सुरु केले, हीच माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठी चूक असेल. धर्माच्या नावाखाली दिशाभूल करणाऱ्यांनाच समाज पाठिंबा देतो, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली.

जितेंद्रसिंह विसेन यांची पत्नी किरण आणि पुतणी राखी यांच्यासह पाच महिलांनी ऑगस्ट २०२१ मध्ये याचिका दाखल करत ज्ञानवापी मशिदीच्या आवारात असलेल्या श्रृंगार गौरी देवीची नित्यपूजा करण्याची परवानगी मागितली होती. मात्र, इतर महिलांबरोबर वाद झाल्याने राखी यांनी सर्वप्रथम माघार घेतली. त्यानंतर विसेन आणि इतर चार याचिकाकर्त्यांमध्येही मतभेद निर्माण झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT