VIral Video  Sakal
देश

Video Viral : मुस्लीम तरूणीसोबत का फिरतोस? अशी विचारणा करत हिंदू तरूणाला मारहाण

बिहारमधील पटना येथे ही घटना घडली आहे.

सकाळ डिजिटल टीम

पटना : बिहारची राजधानी पटना येथे एका हिंदू तरूणाला काही युवकांनी मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. तो एका मुस्लीम असलेल्या आपल्या मैत्रिणीला गाडीवर घेऊन जात असताना काही कट्टरपंथींयांनी हे कृत्य केलं असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अधिक माहितीनुसार, हा व्हिडिओ बिहारमधील पटना येथील पटना मार्केट येथील असून या व्हिडिओमध्ये काही तरूणांनी एका दुचाकीला थांबवलं आहे. त्यावर एक तरूणी आणि तरूण बसलेला आहे. विशिष्ठ समाजातील युवकांनी या तरूण तरूणीला बाजूला घेतलं आणि तरूणाला नाव विचारून "मुस्लीम मुलीला सोबत घेऊन का फिरतो" असा जाब विचारत मारहाण केली आहे.

वास्तविक पाहता हे दोघे क्लासमेट असल्याचं सदर मुलीने यावेळी तरूणांना सांगितलं पण या तरूणांनी तरूणीचे काहीच न ऐकता मारहाण केल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. रस्त्यावर उपस्थित असलेले काही लोक बचावासाठी आले, परंतु बहुतेक लोक फक्त उभे राहून तमाशा पाहत होते. एकानेही या तरूणाला सोडवण्याचा प्रयत्न केला नाही.

सदर व्हिडिओमध्ये युवकांनी या तरूणाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यानी मारहाण केली आहे. "तू काय करतेस तुला कळतं का, तुझं घर कुठे आहे, तू घरी जा" असं हे तरूण तरूणीला बोलत आहेत. तर हे दोघे एकाच कॉलेजमधील आणि एकाच बॅचचे विद्यार्थी असल्याचं तरूणी सांगत असतानाही या तरूणांनी मारहाण थांबवली नसल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

SCROLL FOR NEXT