corona updates
corona updates Google
देश

500 मृतदेहावर अंत्यसंस्कार करणारा कोरोनापुढे हरला

नामदेव कुंभार

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहा:कार माजवलाय. आरोग्य व्यवस्था खोळंबली आहे. ऑक्सिजन, गोळ्या-औषधांच्या तुटवड्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना महामारीनं देशात मृत्यूचं तांडव घातलं आहे. जवळपास 500 मृतदेहावर अंत्यसंस्कार करणाऱ्या कोरोना योद्ध्याला अखेर कोरोनानं गाठलं. हरियाणामधील हिसार येथील प्रविण कुमार (Praveen Kumar) या कोरोना योद्ध्याचा सोमवारी रात्री कोरोनामुळे मृत्यू झाला. (Hisar man who lit pyres of over 300 Covid victims dies of infection two days after testing positive)

प्रविण कुमार (Praveen Kumar) हिसार नगरपालिका सफाई कर्मचारी संघाचे अध्यक्ष होते. कोरोना संक्रमणामुळे सोमवारी रात्री त्यांचं निधन झालं. ऋषी नगर स्मशानभूमीमध्ये प्रविण कुमार यांनी आतापर्यंत 500 पेक्षा जास्त कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार केले आहेत. पण या योद्ध्याचा अखेर कोरोनामुळेच मृत्यू झाला.

स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, प्रविण कुमार (Praveen Kumar) यांना रविवारी रात्री कोरोनामुळे श्वास घेण्यास त्रास होत होता. येथील महात्मा गांधी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. उपचारासदरम्यान सोमवारी प्रविण कुमार (Praveen Kumar) यांचं निधन झालं. प्रविण कुमार यांच्या निधनावर प्रशासन आधिकाऱ्यांनी दु:ख व्यक्त केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: सुनील नारायणचं शानदार अर्धशतक; कोलकाता 100 धावा पार

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT