Tista River Flood sakal
देश

Heavy Rain : अतिवृष्टीचा फटका! उत्तर सिक्कीममध्ये दळणवळण ठप्प; महामार्ग बंद, पर्यटक अडकले

उत्तर सिक्कीमच्या मंगन जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. संततधार पावसामुळे भूस्खलन होऊन मोठे रस्ते, पूल आणि महामार्ग बंद झाले.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

सिक्कीम - उत्तर सिक्कीमच्या मंगन जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. संततधार पावसामुळे भूस्खलन होऊन मोठे रस्ते, पूल आणि महामार्ग बंद झाले. त्यात सुमारे दोन हजार पर्यटक उत्तर सिक्कीममध्ये अडकले असून आपत्तीमुळे मालमत्तेचे मोठे नुकसान व जीवितहानीही झाली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून सिक्कीममध्ये पावसाचा जोर वाढल्याने अनेक भागांतील रस्ते बंद झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग १० हा उत्तर सिक्कीमला पश्चिम बंगालमधील कॅलिम्पाँगशी जोडणारा आहे, तोदेखील भूस्खलनामुळे बंद झाला आहे. परिणामी सिक्कीमचा संपूर्ण उत्तर भाग मुख्य प्रवाहापासून पूर्णपणे तुटला आहे.

सातत्याने होणाऱ्या मुसळधार पावसामुळे मंगन जिल्ह्यातील झोंगू, चुंगथांग, लाचेन आणि लाचुंग या भागाशी संपर्क तुटला असून दळणवळण विस्कळीत झाले आहे. गुरुडोंगमार तलाव आणि युमथांग व्हॅली या पर्यटनस्थळांसाठी हे भाग ओळखले जातात. पर्यटकांना रस्ता पूर्ववत होईपर्यंत तेथेच थांबण्याचा सल्ला स्थानिक प्रशासनाने दिला आहे.

तिस्ता ते दार्जिलिंग, राष्ट्रीय महामार्ग १०, सिंगतम-मंगन-चुंगथांग या रस्त्यांवरून वाहतूक बंद आहे. दरम्यान संगकलांग येथे नव्याने बांधलेला पूलसुद्धा कोसळला. त्यामुळे मंगन, झोंगू आणि चुंगथांग शहरांमधील दुवा तुटला. गेल्या वर्षी तीस्ता नदीला आलेल्या पुरानंतर हा पूल बांधण्यात आला होता.

मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

आपत्तीमुळे मालमत्तेची हानी झाली असून रस्ते खचले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांनी मिंटोकगँग येथे बैठक घेतली. आपत्तीमुळे झालेले नुकसान, जीवितहानी, रस्त्यांची अवस्था, लोकांसाठी सुरक्षिततेचे उपाय व वस्तूंचा पुरवठा आदींवर लक्ष केंद्रित केले.

पावसाची स्थिती

  • २४ तासांत सिक्कीममध्ये सरासरीच्या तुलनेत ११४ टक्के अधिक पाऊस

  • मंगन जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये सरासरीपेक्षा १५२ टक्के अधिक पाऊस

  • १ ते १४ जूनदरम्यान ३३३ मिलिमीटर पावसाची नोंद, जी सरासरीपेक्षा ९० टक्के अधिक

  • पुढील चार ते पाच दिवस सिक्कीममध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Circuit Bench : २८० कोटींच्या ग्रोबझ फसवणुकीत पोलिसांचा तपास उघड न्यायमूर्तींची झाडाझडती; ‘तपास केला तरी काय?’ असा थेट सवाल

Babasaheb Ambedkar Video : आपल्या भीमाचा दरारा! डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे ३ अस्सल दुर्मिळ व्हिडिओ, एकदा बघाच

Viral Video: AI आलं अन् सगळंच बदललं! २०३२ चं जग पाहून तुम्हालाही प्रश्न पडेल, आपली जागा कुठे? भविष्य अतिशय जवळून पाहा

Jamkhed News: माजी नगरसेवकाचा लग्नासाठी तगादा, कलाकेंद्रातील नृत्यांगणेनं केलं असं.. | Rohit Pawar | Sakal News

Junnar Gold Mango : जुन्नर गोल्ड आंबा वाणाला केंद्र शासनाकडून शेतकरी जात म्हणून अधिकृत मान्यता

SCROLL FOR NEXT