HIV Patient Protest Sakal
देश

"आम्ही भीक मागत नाही..."; HIV रूग्णांचे दिल्लीत औषधांसाठी आंदोलन

रूग्णांना औषधांचा पुरवठा करण्यात आला नसल्यामुळे हे आंदोलन करण्यात येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : दिल्लीतील राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या कार्यालयाबाहेर एड्सग्रस्त रूग्णांनी आंदोलन केले आहे. मागच्या काही दिवसांपासून रूग्णांना औषधांचा पुरवठा करण्यात आला नसल्यामुळे हे आंदोलन करण्यात येत असल्याचं रूग्णांनी सांगितलं आहे. दरम्यान लवकरात लवकर औषधं पुरवावेत अशी मागणी करण्यात आली आहे.

(HIV Patient Protest IN Delhi)

HIVच्या निदान होण्यासाठी लागणाऱ्या अँटीरेट्रोव्हायरल औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. दरम्यान मागच्या पाच महिन्यापासून या औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून दिल्ली आणि त्याच्या शेजारील काही राज्यात ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर राज्यातील अधिकाऱ्यांना आम्ही पत्र लिहित मागणी केली पण त्याचा काही फायदा झाला नाही असं एका रूग्णाने सांगितलं आहे.

"आम्ही आमचा हक्क मागत आहोत, कुणाची भीक नाही मागत...", "आम्हाला पूर्ण औषधे द्या." "आम्हाला गोळ्या द्या, फक्त बोलू नका." अशा आशयाचे पोस्टर घेऊन रूग्णांकडून आंदोलन करण्यात येत आहे. तर "जर अशा औषधांचा तुटवडा पडत असेल तर भारत HIVमुक्त कसा होईल असा सवाल रूग्णांनी यावेळी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT