Shahara India Fund  Esakal
देश

Sahara Fund:खूशखबर!सहारामध्ये पैसे अडकलेल्यांसाठी आनंदाची बातमी, सरकार पैसे परत करण्यासाठी लॉंच करणार वेबसाईट

Sahara Refund Portal: भारत सरकारकडून महत्वाची घोषणा,सहारा इंडियामध्ये गुंतवणूक केलेल्यांना मिळणार व्याजासकट पैसे?

सकाळ डिजिटल टीम

Sahara-Sebi Fund:केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह मंगळवारी (दि.१८ जुलै) सहारा रिफंड पोर्टल लॉंच करतील. ही वेबसाईट उद्या (दि.१९ जुलै) सकाली ११ वाजता अटल उर्जा भवनमध्ये लॉंच केली जाईल.

या पोर्टलच्या माध्यमातून त्या गुंतवणूकदारांना पैसे मिळतील, ज्यांच्या गुंतवणीचा वेळ पूर्ण झालाय. गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे कसे मिळतील याबाबतची सर्व माहिती वेबसाईटवर उपलब्ध होईल.

लाखो गुंतवणूकदारांसाठी चांगली बातमी

देशातील लाखो लोकांचे कोट्यावधी रुपये सहारा इंडियामध्ये अडकलेले आहेत. लोक आपली गुंतवलेली रक्कम परत मिळण्याची वाट बघत आहे. सहारा इंडियाचा परिपक्वता काळ पूर्ण होऊनही लोकांना अद्याप त्यांचे पैसे परत मिळालेले नाहीत.(Latest Marathi News)

त्यामुळे लोक अस्वस्थ झाले आहेत.गुंतवणूकदारांनी यासाठी अनेक वेळा आंदोलनही केले. मात्र, यावर कोणताही तोडगा निघू शकला नाही.

सहारा इंडियामध्ये सर्वात जास्त गुंतवणूकदार बिहार, झारखंड, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यांमधील आहेत. काही लोकांनी आपल्या जीवनाची संपूर्ण कमाई सहारा इंडियामध्ये जमा केली होती.(Latest Marathi News)

आता त्यांच्यावर उपासमारीची वेळ आहे. गुंतवणूकीची वेळ पूर्ण होऊनही पैसे न मिळाल्याने अनेक राज्यातील गुंतवणूकदार लोकांमध्ये असंतोष उफाळून येतोय.

सरकारने हस्तक्षेप करावा

गुंतवणूकदारांनी या प्रकरणामध्ये सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. ज्यानंतर आता वेबसाईटच्या माध्यमातून लोकांना पैसे परत केले जाणार नाही.

सुप्रिम कोर्टाने सहारा इंडिया बॅंकमध्ये ग्राहकांच्या जमा केलेल्या पैश्यांवर निर्णय देताना निश्चित केलंय की, सहारा इंडियाच्या सर्व गुंतवणूकदारांना सीआरसीच्या माध्यमातून रक्कम परत केली जाईल.(Latest Marathi News)

सरकारच्या या पाऊलामुळे गुंतवणूदारांध्ये एक आशेचा किरण जागा झालाय. सहारा-सेबी फंडमध्ये एकूण २४००० कोटी रुपये जमा आहेत. २०१२मध्ये सहारा-सेबी फंड तयार करण्यात आला होता.

सहारा-सेबी वाद

सहाराचा हा वाद २००९मधील आहे. जेव्हा सहाराने सहारा हाऊसिंग कॉर्पोरेशन लिमिटेड आणि सहारा इंडिया रिअल इस्टेट या दोन कंपन्यांचे आयपीओ बाजारात आणण्याची ऑफर दिली होती. (Latest Marathi News)

आयपीओ आल्यानंतर सहाराच्या भोगळं कारभाराबद्दल सर्वांना समजलं. सहाराने चुकीच्या पद्धतीने २४००० कोटी रुपये साठवले आहेत, अशी माहिती सेबीला मिळाली.

जेव्हा सेबीने याची चौकशी सुरु केली, तेव्हा त्यांना त्यात अनियमितता आढळली. त्यानंतर सेबीने सर्व गुंतवणूकदारांचे पैसे व्याजासहित परत करायला सांगितले, पण असे झाले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT