Amit Shah and Rahul Gnadhi sakal
देश

New Delhi : राहूल गांधींच्या भारत जोडो‘ वर आता शहांचा हल्लाबोल

राहुल बाबा परदेशी टी-शर्ट घालून भारत जोडण्यासाठी निघाले आहेत;अमित शहा

मंगेश वैशंपायन -सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : राहुल बाबा परदेशी टी-शर्ट घालून भारत जोडण्यासाठी निघाले आहेत' असा हल्लाबोल गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर भाजपने जोरदार शाब्दीक हल्ले सुरू केले आहेत. राहूल गांधी यांनी एका ख्रिस्ती धर्मप्रसारकाची भेट घेण्यावरून भाजपने जोरदार टीका केली आहे. आता खुद्द शहा हेच मैदानात उतरले आहेत.

राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू झाल्यानंतर भाजपचा दिल्लीच्या अशोका रस्त्यावरूनही कार्यरत होणारा ‘आय टी सेल' विलक्षण सक्रिय झाला आहे. राहूल गांधी यांचा कथित विदेशी टी शर्ट, ते मुक्काम करणार असलेला कंटेनर व त्यातील सुविधा, वादग्रस्त धर्मप्रसारक जॉर्ज पोन्नय्या यांची राहूल यांनी घेतलेली भेट आदी गोष्टी हुडकून हुडकून भाजप रोज या यात्रेवर टीकास्त्र सोडत आहे.

शहा यांनी ट्विटमध्ये म्हटले की राहुल बाबा नुकतेच भारत जोडो यात्रेसाठी निघाले आहेत. राहुल बाबा परदेशी टी-शर्ट घालून भारत जोडण्यासाठी निघाले आहेत ! राहुल बाबा आणि काँग्रेसजनांना त्यांच्या संसदेतील भाषणाची मी आठवण करून देतो. राहुल बाबा तेव्हा म्हणाले होते की भारत हे राष्ट्र नाही. अहो राहुल बाबा, कुठली पुस्तके वाचलीत? मॉं भारती हे ते राष्ट्र आहे ज्यासाठी लाखो लोकांनी बलिदान दिले आहे.

भाजप नेते शहजाद पूनावाला यांनी भारत जोडो यात्रेवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी ही यात्रा म्हणजे वास्तवात एक ‘द्वेषपूर्ण मोहीम' असल्याचे म्हटले की "आज काँग्रेसने जॉर्ज पोनय्या यांना भारत जोडो यात्रेचा पोस्टर बॉय बनवले आहे. हा तोच माणूस आहे जो हिंदूंना धमक्या देतो आणि भारतमाते बद्दल अपमानास्पद शब्द बोलतो. शहजाद पूनावाला म्हणाले, काँग्रेस पक्षाला हिंदूविरोधी असल्याचा मोठा इतिहास आहे. राहुल गांधी ‘हेट पेअर' प्रचारात गुंतले आहेत. गेल्या वर्षी जुलैमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी ध४मगुरू पोन्नय्या यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याशी चर्चा करताना राहुल गांधींच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर पक्ष प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की राहुल गांधींच्या पक्ष आणि भारत जोडो यात्रेदरम्यान नवरात्रीच्या आधी मा शक्ती, मा भवानीचा अपमान करणारा व्हिडिओ समोर आला आहे.

हे काही पहिल्यांदाच घडत नाहीये. यापूर्वीही असे अनेक प्रसंग आले आहेत. काँग्रेस, सोनिया जी आणि राहुल जी यांनी हिंदू धर्माविरुद्ध अनेक वेळा अशोभनीय गोष्टी बोलल्या आहेत, मग तो प्रभू राम किंवा माता शक्तीला नकार देण्याचा विषय असो. याच राहुल गांधींना निवडणुकीच्या काळात मंदिर-मंदिरात जावे लागते आणि त्यासाठी एक मुखवटाही तयार केला जातो असेही पात्रा म्हणाले.

पोन्नैया हे पास्टर असून याआधी अनेक विधानांमुळे ते वादात सापडले आहेत. गेल्या वर्षी जुलैमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी जॉर्ज पोन्नय्या यांना अटक करण्यात आली होती.

राजस्थान सरकारवर टीकास्त्र

राजस्थान सरकारच्या १० दिवसांत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे काय झाले? तरुणांना ३५०० रुपयांच्या बेरोजगार भत्त्याचे काय झाले? २० लाख तरुणांना रोजगार देण्याचे काय झाले? काँग्रेस केवळ पोकळ आश्वासने देऊ शकतो. हा पक्ष आश्वासने पूर्ण करू शकत नाही असेही टीकास्त्र शहा यांनी सोडले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT