Amit Shah sakal
देश

Amit Shah : चीनकडून इंचभरही अतिक्रमण नाही: गृहमंत्री शहा

मोदी सरकारच्या काळात चीन भारताच्या इंचभर जमिनीवरही करू शकत नाही, असे ठाम प्रतिपादन गृहमंत्री अमित शहा यांनी आज केले.

सकाळ वृत्तसेवा

लखिमपूर : मोदी सरकारच्या काळात चीन भारताच्या इंचभर जमिनीवरही करू शकत नाही, असे ठाम प्रतिपादन गृहमंत्री अमित शहा यांनी आज केले. चीनच्या १९६२ मधील आक्रमणावेळी तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांनी आसाम आणि अरुणाचल प्रदेशला कसे ‘बाय-बाय’ केले होते, हे जनता कधीही विसरणार नाही, असेही ते म्हणाले. उत्तर प्रदेशातील लखिमपूरमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते.

शहा या वेळी म्हणाले, की भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने देशाची बांगलादेशबरोबरची सीमा सुरक्षित केली असून घुसखोरी रोखली आहे. आसामची यापूर्वीची बांगलादेशला लागून असलेली सीमा घुसखोरीसाठी खुली होती. मात्र, मोदी सरकार केंद्रात सत्तेत आल्यानंतर आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमांचे सरकार स्थापन झाल्यानंतर या सीमेवरून होणारी घुसखोरी आता थांबली आहे.

चीनने १९६२ मध्ये भारतावर आक्रमण केले होते. त्यावेळी पंडित नेहरू यांनी आसाम व अरुणाचल प्रदेशला ‘बाय-बाय’ केले होते. मात्र, आता चीन इंचभर जमिनीवरही आक्रमण करू शकत नाही. अगदी डोकलाममध्येही भारताने घुसखोरी करू पाहणाऱ्या चीनला मागे रेटले, असा दावाही गृहमंत्री अमित शहा यांनी केला.

‘तुमच्या प्रांतांची नावे बदलली तर चालेल का?’

नामसाई (अरुणाचल प्रदेश): ‘‘चीनमधील काही भागांची नावे आपण बदलली, तर ती ठिकाणे भारताचा भाग बनतील का?,’’ असा तिरकस टोला मारत संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी अरुणाचल प्रदेशवरील चीनचा दावा फेटाळून लावला. चीनने भारतीय गावांची नावे बदलल्याने परिस्थितीमध्ये काहीही बदल होणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

आज येथे एका प्रचारसभेत बोलताना राजनाथसिंह यांनी चीनला टोमणा मारला. ते म्हणाले,‘‘आम्हाला शेजाऱ्यांबरोबर चांगले संबंध ठेवायचे आहेत. मात्र, भारताच्या आत्मसन्मानाला धक्का देण्याचा कोणी प्रयत्न केल्यास योग्य प्रत्युत्तर देऊ.

चीनने अरुणाचल प्रदेशमधील तीस ठिकाणांची नावे बदलली आहेत. मात्र त्यामुळे काहीही फरक पडणार नाही. आम्ही चीनमधील काही प्रांतांची नावे बदलली, तर ते प्रांत भारताचे भाग होतील का? नावे बदलल्याने अरुणाचल प्रदेशवर दावा सांगता येईल, या भ्रमात चीनने राहू नये. उलट, अशा प्रकारांमुळे दोन देशांमधील राजनैतिक संबंध बिघडतात.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

No Kings Movement : डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांच्या निषेर्धात आंदोलन; वॉशिंग्टनपासून लंडनपर्यंत हजारो लोक रस्त्यावर उतरले

Pune Fraud: 'ज्येष्ठ नागरिकाची दीड कोटीची फसवणूक'; पहलगाम हल्लाप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या नावाने दाखवली भिती अन्..

Deputy CM Eknath Shinde : 'त्या' विरोधकांसाठी मोफत दवाखाना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; ‘पोटदुखी’ होणाऱ्यांना टोला, नेमकं काय म्हणाले?

E-Vehicle: 'ई-वाहन' खरेदीदारांना सीएम योगींची मोठी भेट; नोंदणी आणि रोड टॅक्समध्ये दोन वर्षांची वाढीव सूट!

Trupti Desai: सासपडेतील संशयिताचा एन्काउंटर करा: तृप्ती देसाई; पीडित कुटुंबीयांचे सांत्वन, कायद्याचा धाक उरलेला नाही

SCROLL FOR NEXT