Madras HC eSakal
देश

Madras HC : गृहिणी घरात २४ तास करतात काम; पतीच्या अर्ध्या संपत्तीवर पत्नीचाही हक्क! हायकोर्टाचा निर्वाळा

न्यायमूर्ती यावेळी म्हणाले, की पत्नीच्या मदतीशिवाय पती पैसे कमवू शकत नाही.

Sudesh

एक गृहिणीचा आपल्या पतीच्या अर्ध्या संपत्तीवर हक्क असतो, असा निर्वाळा मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती कृष्णन रामास्वामी यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली. एक पत्नी कोणतीही सुट्टी न घेता २४ तास घरात काम करत असते, त्यामुळे हे बरोबर असल्याचं कोर्टाने म्हटलं.

गृहिणी सांभाळतात संपूर्ण कुटुंब

कोर्टाने यावेळी म्हटलं, की कित्येक दशकांपासून आपण पाहत आलोय, पत्नी एक संपूर्ण घर सांभाळते. लग्नानंतर कित्येक मुली पती आणि मुलांच्या संगोपनासाठी स्वतःची नोकरी सोडून देतात. यामुळे शेवटी त्यांच्याकडे स्वतःचं असं काहीच उरत नाही.

घरगुती डॉक्टरही असतात महिला

आपल्या घरात २४ तास काम करणाऱ्या महिला, कुटुंबातील सदस्यांना प्रथमोपचार पुरवतात. तसंच, घरातील कोणीही व्यक्ती आजारी पडली तर त्याची देखभाल देखील गृहिणी करतात. यामुळे त्या घरगुती डॉक्टरच असतात.

पत्नीशिवाय पती अपूर्ण

न्यायमूर्ती यावेळी म्हणाले, की आपल्या कुटुंबाची देखभाल करण्यासाठी पत्नीच्या मदतीशिवाय पती पैसे कमवू शकत नाही. पतीने खरेदी केलेली संपत्ती पत्नीच्या नावावर नसली, तरीही ती दोघांनीही एकत्रितपणे प्रयत्न करुन साठवलेल्या पैशांतून घेतली आहे असं मानण्यात यावं.

काय होतं प्रकरण?

कंसाला अम्माल या महिलेने दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देताना कोर्टाने हे मत मांडले. या महिलेने आपल्या पतीच्या मृत्यूनंतर संपत्तीत हक्क मागितला होता. एका स्थानिक कोर्टाने २०१५ साली कंसाला यांची याचिका रद्द केली होती. मात्र, मद्रास उच्च न्यायालयाने कंसाला यांना पतीच्या संपत्तीतील ५० टक्के वाटा मिळावा असा निर्णय दिला.

"घरातील गृहिणीच्या योगदानाला मान्यता मिळण्याबाबत अजून कोणताही कायदा अस्तित्वात नाही. मात्र, कोर्ट हे योगदान नक्कीच पाहू शकतं. महिलांनी केलेल्या त्यागासाठी त्यांना योग्य न्याय मिळावा, याची खात्री करणं हे कोर्ट नक्कीच करू शकतं", असं न्यायमूर्ती यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : अवमानना याचिकेवर सुप्रीम कोर्टाची दिल्ली पोलिसांना नोटीस

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT