Homosexual relationship between SHO and constable; Blackmailing by removing video Homosexual relationship between SHO and constable; Blackmailing by removing video
देश

एसएचओ आणि हवालदाराचे समलैंगिक संबंध; व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंग

सकाळ डिजिटल टीम

अजमेर : हवालदार आणि पोलिस ठाण्याचे एसएचओ यांचे अनेक महिन्यांपासून समलैंगिक संबंध (Homosexual relationship) होते. दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून अश्लील छायाचित्रे चॅट करीत होते. एकदिवस हवालदार प्रदीपने संधी साधून मोबाइलवर एसएचओचा न्यूड व्हिडिओ काढला. यानंतर हवालदाराने एसएचओला ब्लॅकमेल करण्याचा खेळ सुरू केला. एसपींनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहे. ही घटना राजस्थानच्या नागौरमध्ये घडली. (Homosexual relationship between SHO and constable; Blackmailing by removing video)

याची सुरुवात आठ महिन्यांपूर्वी झाली होती. जेव्हा एसएचओ आणि हवालदार यांची मैत्री झाली होती. मैत्रीनंतर दोघांची मोबाईल चॅटिंग सुरू झाली. चॅटिंगनंतर ते अश्लील कृत्य करू लागले. नंतर दोघांमध्ये समलैंगिक संबंधही (Homosexual relationship) निर्माण झाले.

परंतु, हवालदारचा हेतू एसएचओला ब्लॅकमेल करण्याचा होता. त्यामुळे त्याने एसएचओचा न्यूड व्हिडिओ (video) बनवला आणि लाखो रुपयांची मागणी करू लागला, असे या प्रकरणाचा खुलासा करताना नागौर जिल्ह्याचे एसपी राममूर्ती जोशी यांनी सांगितले.

अपमानाच्या भीतीने एसएचओने आतापर्यंत सुमारे अडीच लाख रुपये हवालदारला दिले. मात्र, हवालदाराने आणखी पैसे देण्याची मागणी केली. हवालदाराच्या ब्लॅकमेलिंगला (Blackmailing) कंटाळून एसएचओने खिंवसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी एसपी राममूर्ती यांनी गांभीर्य दाखवत दोघांनाही निलंबित केले आणि हवालदाराच्या अटकेचे आदेश दिले.

एसपीच्या वतीने या प्रकरणाचा तपास सीओ विनोद कुमार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. एसपी म्हणाले की, या प्रकरणामध्ये बरीच माहिती मिळाली आहे. ज्याचा तपास केला जात आहे. खाकीला लाजवेल अशी घटना अघडकीस आल्यानंतर सर्वत्र चर्चा होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याचे भाव कोसळले! सलग चौथ्या दिवशी मोठी घसरण; तुमच्या शहरात आता किती भाव?

Jan Shatabdi: जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड, 3 तासांपासून एकाच ठिकाणी ठप्प; प्रवाशांचा खोळंबा

Karad Encroachment : कऱ्हाडच्या वारुंजी फाट्यावर पहाटे अतिक्रमणावर हातोडा; महामार्गालगतची सहा व्यावसायिक खोकी जेसीबीने जमीनदोस्त

Marathi News Live Updates: ९० कोटींच्या रस्ता निविदेवरून आमदाराचा महापालिका आयुक्तांना धमकीचा आरोप; ठेकेदाराच्या पात्रतेवरून नेमका काय घडला वाद?

Divya Mittal IAS Resignation : आयएएस पदाचा राजीनामा, आता राजकारणात एंट्री; दिव्या मित्तल यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT