Accident News Esakal
देश

Accident News: लग्नाची वरात घेऊन जात असताना क्षणात होत्याचं नव्हतं झालं...; नवरदेवासह ४ जणांचा होरपळून मृत्यू

Accident News: कानपूर महामार्गावरील परिचा ओव्हर ब्रिजजवळ कार आली असता मागून येणाऱ्या डीसीएम वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये कार आणि डीसीएम वाहनाला आग लागली.

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसांमध्ये भीषण अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येते आहे. अशातच झाशी येथे भीषण अपघाताची घटना घडली आहे. अशातच उत्तर प्रदेशातील झाशी येथे भीषण अपघात झाला आहे. झाशी-कानपूर महामार्गावर डीसीएम आणि कार यांच्यात भीषण धडक झाली. काही वेळातच दोन्ही वाहनांनी पेट घेतला आणि कारमधील वरासह चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे. दोघेही जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत वर, वराचा भाऊ, वराचा पुतण्या आणि कार चालक यांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

झाशी जिल्ह्यातील एरिच पोलीस स्टेशन हद्दीतील बिलती गावात राहणाऱ्या आकाशचे १० मे रोजी लग्न झाले होते. बडा गाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छपर गावात आपल्या लग्नाची वरात घेऊन ते जात होते. आकाश त्याचा भाऊ आशिष, 7 वर्षांचा पुतण्या ऐशू आणि दोन नातेवाईक कारमध्ये होते. चालक भगत गाडी चालवत होता. गावातून बाहेर पडल्यानंतर बडा गाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कानपूर हायवेवरील परिचा ओव्हर ब्रिजजवळ आले असता त्यांना मागून येणाऱ्या डीसीएम वाहनाने धडक दिली. या भीषण अपघातात त्यामुळे कार आणि डीसीएम वाहनाला आग लागली.

डीसीएम चालकाने घटनास्थळावरून काढला पळ

आगीचे लोळ पाहून गाडीतील सर्वजण आरडाओरडा करू लागले. डीसीएम चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. हा अपघात पाहून वाटसरूंनी पोलीस स्टेशनला आणि अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली.

दरम्यान, पाठीमागून इतर नातेवाईकांची कार येत होती, त्यांनी कार थांबवली आणि अपघात झालेल्या कारची काच फोडून दोघांना वाचवून त्यांना उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयात पाठवले, तर वर आकाश, भाऊ आशिष, भाचा ऐशू आणि चालक भगत यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग विझवली. आग विझवल्यानंतर पोलिसांनी कारमध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढून ताब्यात घेतले.

घटनास्थळी पोहोचलेले शहर पोलीस अधीक्षक ज्ञानेंद्र कुमार यांनी सांगितले की, कारमध्ये 6 जण बसले होते. त्यात वर, त्यांचा भाऊ व त्याचा पुतण्या व नातेवाईक बसले होते. परिचा ओव्हर ब्रिजवर डीसीएम आणि कारचा अपघात झाला. यामध्ये वरासह एकूण ४ जणांचा होरपळून मृत्यू झाला. चार मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेमुळे आंनदी कुटुंबांवर शोककळा पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT