Covid Positive MBBS Student Exam in Hospital Sakal
देश

हॉस्पिटल झाले परीक्षा हॉल; विद्यार्थी आणि पर्यवेक्षक दोन्ही कोरोनाबाधित

एमबीबीएस मेडिकल इंटर्न (MBBS Medical Intern) कोविड संक्रमित झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून येथे त्यांची परीक्षा सुरू आहे.

सकाळ डिजिटल टीम

Covid Positive Students Will Give Exam from Hospital: जगातील सर्वात अनोखी परीक्षा, जिथे परीक्षार्थी आणि परीक्षक दोघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. कोविड ड्युटीमुळे (Covid Duty) अनेक एमबीबीएस मेडिकल इंटर्न (MBBS Medical Intern एमबीबीएस द्वितीय आणि तृतीय वर्षाचे विद्यार्थी) संक्रमित झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून येथे त्यांची परीक्षा सुरू आहे. त्यांनी परीक्षा दिली नाही, तर कोविडची पुढील ड्युटी मिळण्यात अडचण येऊ शकते. त्यामुळे या वैद्यकीय विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासाठी प्रशासनाने व्यवस्था केली आहे. त्यांचे परीक्षकही तेच आहेत, ज्यांना संसर्ग झाला आहे.

शासकीय वैद्यकीय विज्ञान वैद्यकीय महाविद्यालय हे पूर्णपणे कोविड रुग्णालय आहे. कोविड चाचणीसाठी पश्चिम उत्तर प्रदेशातील सर्वात मोठी प्रयोगशाळा येथे आहे. येथे कोविड चाचणी करण्यासाठी येणाऱ्या तसेच संक्रमित लोकांची संख्या जास्त असते. दुसरीकडे, कोविड वॉर्डमध्ये उपचार घेत असतानाही मेडिकल इंटर्न पुस्तक उघडून अभ्यास करत आहेत. ज्या आयसोलेशन वॉर्डमध्ये अनेक कोविड बाधित घाबरलेले असतात अशा ठिकाणी संक्रमित असूनही परीक्षा देऊन कोविड बाधितांवर उपचार करण्याची ते तयारी करत आहेत.

एमबीबीएस द्वितीय आणि तृतीय वर्षाचे हे विद्यार्थी वैद्यकीय इंटर्न आहेत. त्यांच्या परीक्षा सुरू आहेत, त्यांनी परीक्षा दिली नाही तर त्यांना रुग्णालयात ड्युटी मिळणार नाही. त्यामुळे परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ते अभ्यास करत आहेत. गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे संचालक डॉ.राकेश गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांनी परीक्षा देणार असल्याचे सांगितले. त्याचे धाडस खरोखरच दाद देण्यासारखे आहे. आम्ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT