Kanpur Crime News esakal
देश

Kanpur : मुली आंघोळ करतानाचा अश्लील व्हिडिओ बनवला; वसतिगृहातील कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप

हॉस्टेलमधील कर्मचाऱ्याकडून अश्लील व्हिडिओ बनवल्याची घटना समोर आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

हॉस्टेलमधील कर्मचाऱ्याकडून अश्लील व्हिडिओ बनवल्याची घटना समोर आली आहे.

चंदीगडनंतर (Chandigarh) आता कानपूरमध्येही हॉस्टेलमधील कर्मचाऱ्याकडून अश्लील व्हिडिओ बनवल्याची घटना समोर आलीय. चंदीगड प्रकरणाच्या धर्तीवर कानपूरच्या रावतपूर पोलीस स्टेशन (Rawatpur Police Station) परिसरात असलेल्या साई निवास गर्ल्स हॉस्टेलमध्ये (Sai Niwas Girls Hostel) गुरुवारी मुलींनी कर्मचाऱ्यावर अश्लील व्हिडिओ बनवल्याचा आरोप केलाय.

या प्रकरणी सध्या पोलिसांनी आरोपी कर्मचाऱ्याला अटक केली असून त्याच्या मोबाईलची तपासणी केली जात आहे. याच आरोपांच्या आधारे कानपूर आयुक्तालय पोलीस आरोपींविरुद्ध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करणार आहे. एसीपी कल्याणपूर दिनेश शुक्ला यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली.

या संपूर्ण प्रकरणात वसतिगृहातील विद्यार्थिनींचं म्हणणं आहे की, कर्मचाऱ्याच्या मोबाईलमध्ये विद्यार्थिनींचे अनेक व्हिडिओ आहेत. त्यानं आमचे अश्लील व्हिडिओ बनवले असून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थिनींनी केलीय. सध्या आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याच्या मोबाईलचीही चौकशी केली जात आहे. मोबाईल जप्त केल्यानंतर विद्यार्थिनींनी मोबाईलमध्ये अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ पाहिले आहेत. सध्या विद्यार्थिनींच्या तक्रारीवरून पोलीस वसतिगृहात पोहोचले असता, आरोपीनं मोबाईल देण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला बेदम मारहाण केली आणि त्याच्याकडील मोबाईल काढून घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT