Manipur-Main 
देश

Manipur Violence: मणिपूरात पुन्हा उफाळला हिंसाचार! इंफाळमध्ये जमावाचा धुडगूस, अनेक घरं पेटवली

आत्तापर्यंत इथल्या हिंसाचारात ७४ जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर येत आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

इंफाळ : मणिपूरमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये जातीय दंगल भडकल्या होत्या. त्यातून राज्य काहीसं पूर्वपदावर येत असतानाच सोमवारी पुन्हा एकदा राजधानी इंफाळमध्ये हिंसाचार भडकला आहे. इंफाळच्या ईस्ट डिस्ट्रिक्ट भागात जमावानं काही घरं पेटवून दिल्याचं वृत्त आहे.

यानंतर लष्कर आणि निमलष्करी दलाांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाचारण करण्यात आलं. तसेच संचारबंदी वाढवण्यात आली असून इंटरनेटही बंद करण्यात आलं आहे. (Houses set on fire curfew relaxation cut down Fresh tension grips Manipur capital)

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, इंफाळच्या अरसन भागात जमावानं काही घरं आणि परिसरात जाळपोळ केली. यामुळं इथं आधीच सुरु असलेल्या संचारबंदीच्या वेळेत वाढ करण्यात आली. आधी सकाळी ६ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत इथं संचारबंदी शिथील करण्यात आली होती. त्यात बदल करुन ती आता सकाळी ६ ते दुपारी २ वाजेपर्यंत थिथील करण्यात आली आहे. त्याचबरोबर इंटरनेट सेवांवरील बंदी आणखी पाच दिवसांसाठी वाढवण्यात आली आहे.

सोमवारी नेमकं काय घडलं?

सोमवारी सकाळी १०.३० वाजता इंफाळच्या ईस्ट डिस्ट्रिक्ट भागातील न्यू चेकन बाजार इथं वाद उफाळून आला. त्यानंतर दुपारी २ वाजण्याच्या सुमारास एका जमावानं काही घरं पेटवून दिली. पोलिसांनी याप्रकरणी ३ जणांना अटक केली आहे. आठवड्याभरापासून सुरु असलेल्या इथल्या हिंसाचारातील मृतांचा अधिकृत आकडा ७४ वर पोहोचला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT