How did Japan stop the corona virus without imposing sanctions? 
देश

टाळेबंदी लागू न करता जपानने कसे रोखले कोरोना विषाणूला?

वृत्तसंस्था

टोकिओ- कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. जगात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसांगणिक वाढत आहे. तसेच मृतांची संख्यांही झपाट्याने वाढत आहे. अनेक बलाढ्य देशांना कोरोना महामारीने हैराण करुन सोडले आहे. असे असताना जपान या देशाने कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवलं आहे. जपानमध्ये आतापर्यंत 17,174 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर कोरोना विषाणूने 916 लोकांचा बळी घेतला आहे. समाधानाची बाब म्हणजे 15,118 कोरोनाबाधित ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. या आकडेवरुन जपानने कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर मात करण्यात बऱ्यापैकी यश मिळवल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे जपान सरकारने भारताप्रमाणे कठोर टाळेबंदीदेखील लागू केली नव्हती. मग जपानने असं काय केलं की, कोरोनाची साथ आटोक्यात आली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

इती प्रसाद या भारतीय महिला गेल्या पंधरा वर्षांपासून जपानमध्ये राहतात. त्या एका खासजी कंपनीत इंग्लीश इन्स्ट्रक्टर म्हणून काम करत आहेत. त्यांनी जपानमधील कोरोना विषाणूचा फैलाव कशाप्रकारे झाला आणि तेथील सरकार या बिकट परिस्थितीला कशाप्रकारे सामोरं गेलं याला जवळून पाहिलं आहे. त्यांनी आपला अनुभव ऑडिओच्या माध्यमातून भारतीय नागरिकांसोबत शेअर केला आहे.
----------
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना कोरोना
----------
दिल्लीत पुन्हा संघर्ष; नायब राज्यपालांचा केजरीवालांना दणका
----------
केंद्र सरकारचा नवा उपक्रम; आता घरोघरी होणार तपासणी
----------
डायमंड प्रिन्सेस क्रू हे एक ब्रिटिश जहाज आहे.  हे जहाज जपानच्या योकोहामा हार्बरवर उतरले. या जहाजामधून आलेल्या प्रवाशांच्या माध्यमातून देशात कोरोनाचा शिरकाव झाला. जेव्हा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली, तेव्हा देशात आणीबाणी घोषीत करण्यात आली. मात्र, देशात पूर्णपणे टाळेबंदी लागू करण्यात आली नाही. जपानच्या कायद्यानुसार देशात कडकडीत टाळेबंदी लागू केली जाऊ शकत नाही. मार्चच्या सुरुवातीला लागू केलेली आणीबाणी जपानने मे महिन्याच्या शेवटी उठवली, असं इती सांगतात.

जापनीज लोक हे पूर्वीपासूनच आरोग्यासंबंधी जागरुक आहेत. देशात कोरोनाचा शिरकाव होण्याअगोदर पासूनच सर्व नागरिक मास्कचा वापर करतात. मास्कचा वापर करणे हे जापनीज लोकांच्या सवयीचा एक भाग आहे. तसेच वेळीवेळी सॅनिटाझरचा वापर करणे, हात स्वच्छ धुणे हे सर्व जापनीज लोक पूर्वीपासून करत आले आहेत. ताप, सर्दी, खोकला अशा पसरणाऱ्या आजारापासून वाचण्यासाठी हे लोक मास्क आणि सॅनिटायझरचा वापर सर्रासपणे करत असल्याचं दिसतात. तसेच प्रत्येक जापनीज व्यक्ती हा एकमेकांपासून अंतर ठेवून वावरतो. गळाभेट घेणे किंवा हात मिळवणे अशा पद्धतीने जापनीज लोक एकमेकांचे स्वागत करत नाहीत. तसेच बोलतानाही ते हळू आवाजात बोलतात. त्यामुळे जापनीज लोकांमध्ये मास संसर्ग सहसा होत नाही, असं इती म्हणतात.

जपानमध्ये वृद्ध लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे जपानमध्ये या विषाणूमुळे मृत्यूंची संख्या अधिक असेल, असं मानलं जात होतं. पण जापनीज लोक आपल्या आरोग्यासोबत आहाराचीही चांगली काळजी घेतात. जपानमध्ये लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वजण पोष्टीक अन्न ग्रहन करतात. त्यामुळे जापनीज लोकांची प्रतिकारशक्ती उत्तम आहे. जपानी लोकांनी केवळ मास्कचा पावर, सॅनिटायझरचा वारंवार वापर आणि सामाजिक अंतर राखून कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यश मिळवलं आहे, असं मत इती प्रसाद यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, जपानमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने जपानने देशातील आणीबाणी उठवली आहे. तसेच जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आपलं जात आहे. त्यामुळे मास्क, सँनिटायझर आणि सामाजिक अंतर राखून कोरोनाला नियंत्रित केले जाऊ शकते हे जपाननं सिद्ध केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

SCROLL FOR NEXT