How did Sushil Modi become biggest face of BJP i esakal
देश

रेडिमेड कपड्यांचा व्यवसाय सोडून राजकारणात, ५ वेळा अटक,  बिहारमध्ये भाजपचा सर्वात मोठा चेहरा कसे बनले सुशील मोदी?

Sushil Modi: भाजपचे संकट मोचक म्हणून ओळखले जाणारे दिग्गज नेते सुशील मोदी यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने भाजपच नाही तर सर्वच पक्ष आणि विरोधक दु:खी झाले आहेत. ते कर्करोगाने त्रस्त होते.

Sandip Kapde

Sushil Modi:

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे काल (सोमवार) निधन झाले. ते कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. सुशील कुमार मोदी बिहारचे अर्थमंत्री देखील होते. रेडिमेड कपड्यांचा व्यवसाय सोडून राजकारणात आले होते. बिहारमध्ये सत्तेपवर येण्याचे भाजपचे स्वप्न पूर्ण करण्यात सुशील मोदी यांचा सिंहाचा वाटा होता. तसेच  बिहारमधील जेडीयू-आरजेडी महाआघाडीचे सरकार पडण्यामागे त्यांची प्रमुख भूमिका होती.

१९६२ मध्ये चीनसोबत झालेल्या युद्धादरम्यान सुशील मोदी यांनी शाळेतील मुलांना जमा केले होते. नागरिकांना, शाळेतील मुलांना त्यांनी फिटनेसचे धडे दिले. यादरम्यान त्यांनी आरएसएसमध्ये प्रवेश केला. सुशील मोदी १९७३ मध्ये पाटणा विद्यापीठ विद्यार्थी संघाचे सरचिटणीस होते.

पाटणा विश्वविद्यालय शिकताना सुशील मोदी विद्यार्थी राजकारणात सक्रिय होते. १९७४ मध्ये जयप्रकाश नारायण यांच्या आवाहनावरुन त्यांनी विद्यार्थी चळवळीत उडी घेतली. जेपी आंदोलन आणि आणीबाणीच्या काळात त्यांना ५ वेळा अटक झाली होती. सुशील मोदी यांनी राज्य संघटन सचिव, अखिल भारतीय सचिव, उत्तर प्रदेश आणि बिहारचे प्रभारी,  विद्यार्थी परिषदेचे ऑफ इंडिया सरचिटणीस ही पदे १९७७ ते १९८६ या काळात भूषवली.

सुशील कुमार मोदी यांची सक्रिय राजकारणात एंट्री झाली ती १९९० मध्ये, पाटणा मध्य विधानसभा मतदारसंघातून मोदी निवडून गेले. त्यांनतर १९९५, २००९ मध्ये देखील त्यांनी विधानसभा गाजवली. लालू प्रसाद यादव चारा घोटाळ्यात अडकले होते. याबाबत त्यांच्या विरोधात सुशील मोदी यांनीच जनहित याचिका दाखल केली होती.

पुढे २००४ मध्ये मोदी यांनी लोकसभा जिंकली. भागलपूरमधून ते ते निवडून आले होते. त्यांनतर २००५ मध्ये एनडीएला बिहारमध्ये बहुमत मिळाले. नितीशकुमार मुख्यमंत्री झाल्यानंतर सुशील मोदी यांनी उपमुख्यमंत्री करण्यात आले. अर्थमंत्रीपद देखील त्यांना देण्यात आले.   २०१० मध्ये देखील नितीश सरकारमध्ये सुशील मोदी उपमुख्यमंत्री होते.  २०११ मध्ये, सुशील मोदी यांना जीएसटीवर स्थापन करण्यात आलेल्या राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT