varun singh ANI
देश

"हेलिकॉप्टर अपघातातून बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांची प्रकृती गंभीर"

वरुण सिंह यांच्या प्रकृतीची लोकसभेत दिली माहिती

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : सीडीएस हरिश रावत यांच्यासोबत हेलिकॉप्टरमधून जात असताना झालेल्या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे एकमेव बचावलेली व्यक्ती आहेत. त्यांच्यावर सध्या वेलिंग्टन येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत माहिती दिली.

राजनाथ म्हणाले, "हेलिकॉप्टर अपघातातून बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांच्यावर सध्या वेलिंग्टन येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांची जीव वाचवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत."

दरम्यान, ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे अपघातातून बचावले असले तरी ते ४५ टक्के भाजले आहेत. त्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर असली तरी प्रकृती स्थिर आहे. त्यांना वेलिंग्टन येथील मिलिटरी हॉस्पिटलमधून बंगळुरुच्या एअरफोर्स कमांड हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असंही राजनाथ सिंह यांनी लोकसभेत बोलताना सांगितलं.

वरुण सिंह यांना मिळालेले पुरस्कार

लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट स्क्वाड्रनचे पायलट असलेले विंग कमांडर वरुण सिंह यांना या वर्षी १५ ऑगस्ट रोजी शौर्य चक्रने सन्मानित करण्यात आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलच्या आणखी १० फेऱ्या, १२ डब्यांच्या लोकलचे १५ डब्यांत रूपांतर

FDA Crime : पुणे शहरातील प्रसिद्ध गोल्‍डन बेकरीसह दहा बेकरी, रेस्टॉरंटचे परवाने निलंबित; अस्वच्छतेप्रकरणी एफडीएची कारवाई

Garfield Sobers: क्रिकेटच्या इतिहासातील महान ऑलराउंडर काळाच्या पडद्याआड! गॅरी सोबर्स यांचं निधन; क्रीडाजगत शोकसागरात

Pune News : जप्त गुळाचे करायचे काय? गूळ उत्पादकांचा सवाल, जवळपास ४०० गुऱ्हाळांवर परिणाम

Amritsar Express: अमृतसर एक्स्प्रेसच्या डब्याखाली सापडला मानवी पाय; सीएसएमटी रेल्वे यार्डमधील घटना, रेल्वे पोलिसांना वेगळाच संशय

SCROLL FOR NEXT