Vaccination
Vaccination esakal
देश

तिसऱ्या लाटेचे सावट; लस किती काळ कोरोनापासून ठेवते सुरक्षित?

कार्तिक पुजारी

भारतात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली असून दररोज लाखो नागरिकांना लस दिली जात आहे.

नवी दिल्ली- भारतात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली असून दररोज लाखो नागरिकांना लस दिली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 21.58 कोटी डोस नागरिकांना देण्यात आले आहेत. भारतात सध्या तीन लशींच्या वापराला परवानगी आहे. यात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड, भारत बायोटकची कोवॅक्सिन आणि रशियाच्या स्पुटनिक लशींचा समावेश आहे. या सर्व लशींचे दोन डोस कोरोना विषाणूवर प्रभावी ठरत आहेत. भारत सरकारने कोविशिल्ड लशींच्या दोन डोसमधील अंतर 12 ते 16 आठवडे, कोवॅक्सिनसाठी 4 ते 5 आठवडे आणि स्पुटनिक V लशीसाठी 21 ते 90 दिवस असे निर्धारित केले आहे. पण, लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर किती दिवस एखाद्याच्या शरीरात इम्युनिटी टिकते? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. (How Long Can Your Covid Vaccine Protect You 3rd Wave corona virus)

इम्युनिटी तयार होण्यासाठी किती वेळ लागतो?

जागतिक आरोग्य संघटनेच्या डॉ. कॅथरिन ओब्रायन सांगतात की, लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर चांगला इम्युन प्रतिसाद मिळण्यासाठी 2 आठवड्यांचा कालावधी लागतो, पण लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर इम्युनिटी बुस्ट होते. त्यामुळे कोरोना विषाणूपासून संरक्षण होण्यास मदत होते.

किती दिवसांपर्यंत इम्युनिटी टिकते?

संशोधकांनुसार शरीरात किती दिवस इम्युनिटी राहते याबाबत संदिग्धता आहे. डॉ. कॅथरिन सांगतात की, किती दिवस शरीरात इम्युनिटी टिकते हे नक्की सांगता येत नाही. यासाठी आणखी वेळ लागेल. लस घेतलेल्या लोकांचे आम्ही परीक्षण करत आहोत. तसेच लस घेतलेल्यांना नेमकी कधी विषाणूची बाधा होत आहे, हे आम्ही तपासत आहोत. त्यामुळे येत्या काळात आपल्याला याबाबत निश्चित अशी माहिती सांगता येईल.

असे असले तरी फायझर लशींचे दोन डोस घेतल्यानंतर शरीरात सहा महिन्यांसाठी इम्युनिटी राहते. मॉडर्ना कंपनी लसही सहा किंवा त्यापेक्षा अधिक काळासाठी इम्युनिटी टिकवते.सीरमच्या कोविशिल्ड लशीबाबत सांगतलं जातंय की, दोन्ही डोस घेतल्यानंतर शरीरात किमान एक वर्षासाठी इम्युनिटी टिकून राहते. पण याबाबत निश्चित असं काही सांगितलं जाऊ शकत नाही, असं डॉ. कॅथरिन म्हणाल्या. त्यामुळे याबाबतचा संपूर्ण डाटा मिळण्याची वाट पाहावी लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghatkopar hoarding : 'जीव वाचला पण रोजी रोटी गेली'; गंभीर जखमी झालेले टॅक्सी चालक सुभेदार मोर्या यांची व्यथा

Table Tennis: मनिका बत्राने रचला इतिहास! 'असा' पराक्रम करणारी बनली पहिलीच भारतीय महिला टेबल-टेनिसपटू

PM Modi: ना घर, ना जमीन; पंतप्रधान मोदींची किती आहे संपत्ती? शपथपत्रातून आलं समोर

IND W vs SA W: भारत दौऱ्यावर येणार दक्षिण आफ्रिका संघ! BCCI ने केली शेड्युलची घोषणा, पाहा कधी आणि केव्हा होणार सामने

Marathi News Live Update: घाटकोपर होर्डिंग्ज दुर्घटनेचा वाहतूक कोंडीवर परिणाम कायम

SCROLL FOR NEXT