mamata banerjee 
देश

मोदींविरोधात किती नोटीशी पाठवल्या? निवडणूक आयोगावर भडकल्या ममता बॅनर्जी

सकाळवृत्तसेवा

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभेच्या निवडणुका सुरु आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारण भलतंच तापलेलं दिसून येत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मुस्लिम मतदारांना एकजूट होण्याच्या आवाहनावर ममता बॅनर्जींना निवडणूक आयोगातर्फे नोटीस पाठवण्यात आली होती. त्यांना दामजूरमध्ये निवडणुकीच्या प्रचार सभेदरम्यान संबोधित करताना निवडणूक आयोगावरच ताशेरे ओढले आहेत. त्यांनी विचारलंय की, आतापर्यंत नरेंद्र मोदींच्या विरोधात आयोगाने किती तक्रारी नोंद केल्या आहेत?

- राज्यभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ममता बॅनर्जींचा हल्लाबोल
दामजूरमधील प्रचारसभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय की, माझ्या विरोधात 10 'कारणे दाखवा' नोटीस दिल्या गेल्या तरी त्यातली एकसुद्धा अर्थपूर्ण नसणारे. मी प्रत्येकाला एकजूट होऊन मतदान करण्यासाठी सांगत आहे, ना की मी कुणामध्ये फूट पाडत आहेत. आतापर्यंत नरेंद्र मोदींच्या विरोधात किती तक्रारी दाखल करण्यात आल्या? ते तर दररोज हिंदू-मुस्लिम करत असतात. 

भाजप नेत्यांवर साधला निशाणा
ममता बॅनर्जी यांनी आपल्या प्रचारादरम्यान निवडणूक आयोगासोबतच भाजप नेत्यांवर देखील निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलं की, नंदीग्रामच्या मुस्लिमांना पाकिस्तानी म्हणणाऱ्या लोकांविरोधात किती तक्रारी दाखल झाल्या? त्यांना लज्जास्पद वाटत नाही? ते माझ्याविरोधात काही करु शकत नाहीत. मी हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन यांच्याशिवाय इतर जनजातींच्या देखील सोबत आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs ZIM: कसोटी क्रिकेटला मिळावा नवा 'त्रिशतकवीर'! द. आफ्रिकेच्या कर्णधाराने गोलंदाजांना झोडपत नोंदवले वर्ल्ड रेकॉर्ड

Stock market News : ‘MRF’ स्टॉकशी पुन्हा बरोबरी केली ‘या’ शेअरने! ; 3 रुपयांवरून थेट 300000 पर्यंत वाढली होती किंमत अन् आता...

राम कपूरच्या 'मिस्त्री' मध्ये झळकतोय मराठमोळा अभिनेता; मराठीत दिलाय कोट्यवधींचा सिनेमा

Latest Maharashtra News Updates : नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ

Thane News: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून विद्यार्थी पडले, दोन मुले गंभीर जखमी; ठाण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT