Hundreds of vehicles kept passing by on the road on dead body delhi gaziabad crime  
देश

असा मृत्यू शत्रूलाही येऊ नये! रस्ते अपघातात शेकडो गाड्या अंगावरुन जात राहिल्या; पोस्टमार्टमही शक्य नाही

दिल्लीला लागून असलेल्या गाजियाबादमध्ये एक अत्यंत दुर्दैवी प्रकार समोर आला आहे. रस्ते अपघात एका मृतदेहावरुन शेकडो गाड्या गेल्याची घटना घडलीये.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- दिल्लीला लागून असलेल्या गाजियाबादमध्ये एक अत्यंत दुर्दैवी प्रकार समोर आला आहे. रस्ते अपघात एका मृतदेहावरुन शेकडो गाड्या गेल्याची घटना घडलीये. वेव सिटी भागात धुक्यांमुळे एनएन-९ वर एका वाहनाचा अपघात झाला होता. त्यानंतर मृतदेहावरुन शेकडो गाड्या जात राहिल्या. धुके हटल्यानंतर सकाळी जवळपास १० वाजता लोकांना रस्त्यावर रक्त दिसले. त्यामुळे त्यांनी यासंदर्भातील माहिती पोलिसांना दिली. (Hundreds of vehicles kept passing by on the road on dead body delhi gaziabad crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या गाजियाबादमध्ये राष्ट्रीय महामार्ग ९ वरती एका व्यक्तीचा अपघात झाला. या वक्तीचे छिन्नविछिन्न झालेले अवयव आढळून आले आहेत. मंगळवारी सकाळी धुके कमी झाल्यानंतर मृत व्यक्तीबाबत माहिती मिळाली होती. रस्त्यावरील वाहने अंगावर जात राहिल्याने व्यक्तीच्या शरीराचे पूर्ण तुकडे झाल्याचे आढळून आले.

गाजियाबाद-हापुड हायवेवर वेव सिटी पोलीस स्टेशन हद्दीत सद्भावना चौकाजवळ हा अपघात घडला. पोलिसांनी मृतदेहाचे काही तुकडे गोळा केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरुन डोक्याचे काही केस, एक बोट आणि कानाचा एक तुकडा मिळाला आहे. सदर घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, मृत व्यक्ती कोण आहे हे कळू शकलेलं नाही. पोलीस या अपघाताप्रकरणी आजूबाजूच्या भागात विचारणा करत आहेत. परिसरातील इतर पोलीस स्टेशनला देखील माहिती देण्यात आली आहे. मृतदेह पोस्टमार्टम होण्याच्या देखील स्थितीमध्ये नाहीये. व्यक्ती बेपत्ता असल्याची एफआयर कोणी दाखल केली तर याबाबत कळू शकेल. पोलीस आपल्यापरीने प्रयत्न करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv News: अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन व कर्जबाजारीपणामुळे भूम तालुक्यातील शेतकऱ्याने संपवले जीवन

Ladki Bahin yojana: बहिणींसाठी ‘ई-केवायसी’ रुसली; ‘कनेक्टिव्हिटी’सह संकेतस्थळ वारंवार बंद होत असल्याने मनस्ताप

ठाण्यात सरकारी जागेवर ३ इमारती बांधल्या, बिल्डरकडून ११२ फ्लॅटधारकांची कोट्यवधींची फसवणूक

अरे वाह! 'या' मराठी अभिनेत्रीचा झाला साखरपुडा, नवरा सुद्धा आहे 'या' मालिकेतील अभिनेता, सोशल मीडियावर फोटोची चर्चा

Latest Marathi News Live Update : पुण्यातील गुंड घायवळ चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने विदेशात पळून गेला,अनिल देशमुखांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT