Husband commits suicide by posting video
Husband commits suicide by posting video Husband commits suicide by posting video
देश

पतीने कोला व्हिडिओ पोस्ट; आत्महत्येला धरले सासरच्या मंडळीला जबाबदार

सकाळ डिजिटल टीम

विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या (commits suicide) करण्यापूर्वी पतीने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला. आपल्या मृत्यूला पत्नी, सासू आणि सासरे जबाबदार असल्याचे त्याने सांगितले. छळाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे त्याने म्हटले. भगवानदास धाकड असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना मध्य प्रदेशातील विदिशा येथे घडली. (Husband commits suicide by posting video)

प्राप्त माहितीनुसार, भगवानदास धाकड याने विषारी पदार्थ सेवन करण्यापूर्वी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला. ज्यामध्ये त्याने आपला छळ केल्याचा आरोप केला. त्याने व्हिडिओमध्ये पत्नी, सासू आणि सासरे या तिघांचीही नाव घेतले. यानंतर भगवानदासने विषारी द्रव्य प्राशन केले. दरम्यान, या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर भगवानदास याला पोलिसांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

शमशाबाद पोलिस स्टेशनअंतर्गत एका व्यक्तीने तीन दिवसांपूर्वी विष प्राशन केले होते. त्याला तत्काळ विदिशा येथे रेफर करण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, तरुणाचा मृत्यू (commits suicide) झाला. पोलिस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. सर्व वस्तुस्थितीचे निरीक्षण करून बयाण घेतले जात आहे, असे विदिशाच्या पोलिस अधीक्षक मोनिका शुक्ला यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी सोलापुरात दाखल; थोड्याच वेळात होणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT