husband kill wife and two children at ghaziabad 
देश

मी, पत्नीवर खूप प्रेम करीत होतो पण...

वृत्तसंस्था

गाझियाबाद (उत्तर प्रदेश): मी, माझ्या पत्नीवर खूप प्रेम करत होतो. पण, तिला मुलांसोबत बोलायची आणि दारू प्यायची सवय होती, असे लिहून पतीने पत्नीसह दोन मुलांची हत्या केल्याची घटना येथे घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

धीरज त्यागी आणि काजल हे दांपत्य दोन लहान मुलांसोबत राहात होते. पण, धीरज पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यावरून दोघांमध्ये भांडणे होत होती. गुरुवारी (ता. 27) दोघांमध्ये भांडण झाले होते. यानंतर धीरजने पत्नी आणि दोन लहान मुलांची हत्या केली. हत्येनंतर घराच्या भिंतीवर सुसाइड नोट लिहिली आणि घराच्या छताला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली.

धीरजने भिंतीवर लिहिले होते की, 'मी, पत्नीवर खूप प्रेम करत होतो. पण, ती सतत मुलांसोबत फोनवर बोलायची. तिला अनेकदा समजावले. शिवाय, तिला दारु पिण्याची सवय लागली होती. यासाठी तिचे भाऊ जबाबदार आहेत.' दरम्यान, पोलिसांनी सर्वांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले आहेत. घरामध्ये लिहीलेल्या सुसाइड नोटवरून पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूरकरांना हवाई प्रवासाचा झटका; मुंबईसह अनेक शहरांची विमानसेवा दोन महिन्यांसाठी बंद, कारण काय?

IPL 2026 Final, RCB vs GT live: शुभमन गिलची विकेट अन् वाचला विराट कोहली-एबी डिव्हिलियर्सचा ऑल टाईम रेकॉर्ड...

Paithan Chowk Chaos: पाचोडमध्ये वाहतूक कोंडीचा कळस; आठवडी बाजाराच्या दिवशी पैठण चौक ठप्प, नागरिक हैराण

IPL 2026 Final, RCB vs GT live: चार आयपीएल फायनल खेळणाऱ्या बंगळुरूचा इतिहास नाही खास, गुजरात म्हणूनच आनंदी

SSC Marksheet Distribution: दहावीच्या विद्यार्थ्यांना सोमवारी गुणपत्रक व प्रमाणपत्र वाटप; सकाळी शाळांना, दुपारी विद्यार्थ्यांना वितरण

SCROLL FOR NEXT