husband killed his wife and lover at kanpur 
देश

हॅलो पोलिस, पत्नी अन् तिच्या प्रियकराचा खून केलाय...

वृत्तसंस्था

कानपूर (उत्तर प्रदेश) : हॅलो पोलिस, मी माझी पत्नी आणि तिच्या प्रियकराचा खून केला असून, मला अटक करा, असे एकाने आज (शुक्रवार) पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी घटनास्थळावरून संशयिताला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'कानपूर जिल्ह्यातील नरौना गावामध्ये दुहेरी हत्याकांडाची घटना आज घडली. राजेश कुरील याने त्याची पत्नी सुनिता व तिचा प्रियकर मनीषची हत्या केल्याची माहिती फोनवरून दिली. पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व राजेशला अटक करण्यात आली. दोघांचे मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी पाठविण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू आहे.'

राजेशने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, 'पत्नी सुनिता व नातेवाईक असलेला मनीषचे प्रेमसंबध होते. प्रेमसंबधांवरून आमच्या दोघांमध्ये अनेकदा भांडणे होत होती. सुनिताला समजावूनही सांगितले होते. परंतु, दोघांचे भेटणे सुरूच होते. गुरुवारी (ता. 10) रात्री मनीष घरी आला होता. सर्वांनी एकत्र जेवण केले आणि झोपायला गेले. मध्यरात्री धारदार शस्त्राने प्रथम मनीषचा गळा कापून खून केला त्यानंतर पत्नीचा खून केला. दोघांचा खून केल्यानंतर पोलिसांना फोन करून सांगितले.'

दरम्यान, गावामध्ये दुहेरी खून झाल्यामुळे परिसरामध्ये नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन सेटवर घसरून पडले, गुडघ्याला दुखापत; उभं राहता येईना, नेमकं काय घडलं?

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT