Girl suicide esakal
देश

धक्कादायक! नवऱ्याने ब्युटी पार्लरला जाण्यापासून रोखल्याने महिलेची आत्महत्या

या महिलेचं आपल्या पतीसोबत याच मुद्द्यावरून भांडण झालं होतं.

वैष्णवी कारंजकर

इंदौरच्या मध्यप्रदेशमध्ये पतीने ब्युटी पार्लरला जाण्यापासून रोखल्यामुळे महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या महिलेने गळफास लावून घेतला आहे.

ही ३४ वर्षीय महिला मध्य प्रदेशातल्या इंदौर शहरात राहते. तिने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबद्दल पोलिसांनी या महिलेच्या पतीकडे विचारपूस केली. तेव्हा या दोघांमध्ये भांडणं झाल्याचं पतीने सांगितलं.

ब्युटी पार्लरला जाण्यावरून या दोघांमध्ये भांडणं झाल्याची माहिती हाती येत आहे. पतीने पोलिसांना सांगितलं की त्याने या महिलेला ब्युटी पार्लरला जाण्यापासून रोखलं होतं. त्यानंतर या महिलेला राग आला. आणि रागाच्या भरात तिने स्वतःला गळफास लावून घेतला.

या प्रकरणी शवविच्छेदन केलं जाईल, तसंच सर्व बाजूंनी तपास केला जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

SCROLL FOR NEXT